क्राइम

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे करून ते प्रेशर कुकर मध्ये शिजवले

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

 मुंबईजवळच्या मिरारोड परिसरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या इसमानं त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीला संपवल्यानंतर त्यानं करवतीनं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. आसपासच्या लोकांपर्यंत दुर्गंधी जाऊ नये, त्यामुळे त्यांना कोणताही संशय येऊ नये यासाठी आरोपीनं मृतदेहाचे तुकडे कूकरमध्ये उकळले पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे

मिरारोडमध्ये नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गीता-आकाशदिप सोसायटी आहे. या सोसायटीच्या सातव्या मजल्यावर ५६ वर्षांचे मनोज साने त्यांची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य (३६) सोबत बऱ्याच महिन्यांपासून वास्तव्यास होते. काही दिवसांपासून मनोज यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. त्यांचे शेजारी या वासामुळे त्रस्त झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
नया नगर पोलिसांनी मनोजचं घर गाठलं. त्यांनी दार ठोठावलं. दार उघडताच उग्र दुर्गंधी आली. पोलिसांनी घराची झडती सुरू केली. तेव्हा त्यांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. हा प्रकार पाहून पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी मनोजला अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची कबुली त्यानं दिली.

मनोज आणि सरस्वतीचा काही कारणांवरुन वाद झाला. मनोजनं संतापाच्या भरात सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर मनोज बाजारात गेला आणि करवत घेऊन आला. त्यानं फ्लॅटमध्ये येऊन मृतदेहाचे अनेक तुकडे केले. ते तुकडे त्यानं प्रेशर कूकरमध्ये टाकून उकळले. पुरावे मिटवण्यासाठी आणि दुर्गंधी टाळण्यासाठी त्यानं हा प्रकार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

महिलेची हत्या ३ ते ४ दिवसांपूर्वी झाली असावी असं पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितलं. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करुन शवविच्छेदनासाठी पाठवले. फॉरेन्सिकचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. फ्लॅटमधील अन्य पुरावेदेखील गोळा करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालातून अधिक माहिती उघडकीस येईल, असं पोलिसांनी सांगितलं. आरोपीची चौकशी सुरू असून फ्लॅट सील करण्यात आला आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close