ओठांच्या आजूबाजूला या कारणाने दिसतात रेषा

वाढत्या वयानुसार ओठांच्या आसपास रेषा दिसू लागणं याला स्मोकर्स लाइन्स, लिप लाइन्स किंवा लिप रिंकल्स असे म्हंटले जाते. या रेषा पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये स्ट्रॉ म्हणजेच पाईप असल्याने येतात.
वाढत्या वयानुसार शरीरामध्ये अनेक बदल होतात.वय वाढल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या येणं, रेषा दिसणं यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवण्याची शक्यता असते. त्यातील एक समस्या म्हणजे ओठांवर सुरकुत्या येणं. पण तुम्हाला माहित आहे का नेमकं ओठांवर सुरकुत्या कशामुळे येतात? यामागे कारण काय? चला तर जाणून घेऊया त्वचारोगतज्ञ डॉ. हितशा यांनी सांगितलेले मोठे कारण.
वाढत्या वयानुसार ओठांच्या आसपास रेषा दिसू लागणं याला स्मोकर्स लाइन्स, लिप लाइन्स किंवा लिप रिंकल्स असे म्हंटले जाते. या रेषा पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये स्ट्रॉ म्हणजेच पाईप असल्याने येतात. याचा जास्त त्रास धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. या संदर्भात डॉ. हितशा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे, ज्यावेळी आपण बाटलीमधून पाणी पितो तेव्हा ओठ लहान होतात. तसेच जेव्हा ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली जाते तेव्हा ओठांवर रेषा कायम दिसतात. त्यामुळे ओठावर सुरकुत्या दिसतात. जर या समस्येपासून तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही बाटलीने पाणी पिण्याऐवजी ग्लास किंवा उघड्या तोंडाच्या बाटलीतून पाणी प्याले पाहिजे
धूम्रपान करण्याची सवय असलेल्या व्यक्तींचे ओठ लवकर खराब होऊन ओठांवर सुरकुत्या दिसतात. जर तुम्हाला या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर डर्मा फिलर्स, केमिकल पील, लेझर रिसरफेसिंग, मायक्रोनेडलिंग, बोटॉक्स, प्लेटलेट-समृद्ध प्लाझ्मा आणि डर्माब्रेशन सारखे उपचार घेतले पाहिजे. तसेच डर्मा फिलर्स उपचारामध्ये ओठ आणि आसपासच्या त्वचेमध्ये फिलर्स टोचले जातात. ज्यामुळे ओठांवर सुरकुत्या पडलेल्या दिसत नाहीत. रासायनिकरित्या त्वचेची साल काढून टाकली जाते. लेझर रीसरफेसिंगमुळे त्वचेचा वरचा थर काढून टाकला जातो. ज्यामुळे त्वचेवर घट्टपणा येतो. ही प्रक्रिया करत असताना फिरत्या ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने त्वचेवरील वरचा थर काढून टाकला जातो. यामुळे ओठांच्या आजूबाजूला आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.