नियमाचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्र संचालकाचे परवाने निलंबित
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दोन कुषि केंद्र यांनी कीटकनाशकाची विक्री स्त्रोत परवान्यात समाविष्ट न करता विहित नमुन्यातील विक्री नोंदवही ठेवून त्यामधील नोंदी न घेणे विहित केलेली विक्री पावती चा वापर न करणे विहित नमुन्यातील मुदत बाह्य नोंदवही ठेवून त्यामध्ये नोंदी न घेणे या कारणासाठी कीटकनाशक अधिनियम 1968 मधील तरतुदीनुसार तीन महिन्यासाठी कीटकनाशक परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत.
नियमाचे उल्लंघन होत असल्याबाबत लक्ष्मण खांडरे कृषी अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या तपासणीत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे,
किंटकनाशक परवाने निलंबित केले आहेत,
पण या आदेशा विरोधात संबधित परवाने धारक ३० दिवसाच्या आत अपिलीय प्राधिकारी तथा विभागीय कुषी सहसंचालक यांच्या कडे अपिल दाखल करु शकतील ,असे आदेशात नमुद आहेत.
शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठा खात्रीलायक व उच्च गुणवत्तेच्या असाव्या त्यासाठी त्यांनी अधिकृत कृषी केंद्र धारकाकडून खरेदी कराव्यात जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. खरेदी करताना विक्री पावती जपून ठेवावी. तसेच पेरणी करताना शक्यतोवर पिशवी खालच्या बाजूने फोडून वापरावे.
कुठेही फसवणुकीचा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी अधिकारी पंचायत समिती तथा तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान याद्वारे करण्यात येते आहे