शाशकीय
गडलिंग कारवाईचे करतो ढोंग ‘चिरीमिरी ‘ घेऊन चोरी गेल्याचे घेतो सोंग !

तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी वाळू तपासणीचे काढून घेतलेले अधिकार कोणी केले बहाल ?
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी
शेतकऱ्यांपासून अभिलेख दुरुस्तीच्या नावावर लाचेची मागणी करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतांनाच गडलिंग यांनी रात्री पकडलेले अवैध वाळू चे वाहन ‘ चिरीमिरी ‘ घेऊन सोडून दिल्याची खमंग चर्चा तहसील कर्मचारी आणि अधिकारी वर्तुळात सुरू आहे. वरिष्ठ या वादग्रस्त नायब तहसीलदारांच्या विरोधात काय कारवाई करतात याकडे जनतेचे लाख लागले आहे.
तहसील कार्यालय अधिकारी आणि कर्मचारी वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार नायब तहसीलदार गडलिंग आणि मंडळ।अधिकारी प्रकाश बामनोटे यांनी रात्री 1.30 ते 2 वा दरम्यान देवगाव चौफुलीवर पुलगाव कडून येणारा आणि अमरावतीला जाणारा वाळूचा ट्रक क्र. एम एच 40 आय 8758 पकडला होता. संबंधित वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक रॉयल्टी आणि इतर कागदपत्रे नसल्याने त्यांनी तो तहसील कार्यालयात लावला.
‘ चिरीमिरी ‘ घेऊन ट्रक सोडल्याची चर्चा – नियमानुसार कागदपत्रे नसतांना पकडण्यात आलेले वाहन तहसील कार्यकायात लावल्यावर पकडण्यात आलेल्या वाहन चालका जवळून संबंधित अधिकारी वाहनाची चाबी काढून स्वतः जवळ ठेवतात. मग तहसील कार्यालयाच्या कस्टडीत असलेले वाहन चालक घेऊनच कसा जातो ? असा यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे. तहसील कार्यालय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार नायब तहसीलदार नामदेव गडलिंग आणि या कारवाईत सहभागी असलेल्या चमूने ‘ चिरीमिरी ‘ घेऊन सदर वाहन सोडून दिल्याची चर्चा आहे.
पवनीत कौर यांनी काढून घेतले होते कारवाईचे अधिकार – विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तत्कालीन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी नामदेव गडलिंग यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडून वाळू वाहन तपासणीचे सर्व अधिकार काढून घेतले होते.
गडलिंग यांना कोणी बहाल केले कारवाईचे अधिकार – तत्कालीन जिल्हाधिकारी कौर मॅडम यांनी गडलिंग यांच्या कडून वाळू वाहन चोरीचे काढून घेतलेले अधिकार कोणी बहाल केले ? होते} कळीचा मुद्दा ठरत आहे.
वरिष्ठांच्या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष – शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या अभिलेखात झालेल्या चुकीच्या नोंदणी दुरुस्ती साठी गडलिंग यांनी तहसील मध्ये सोडलेल्या ‘ दलालांच्या ‘ माध्यमातून लाचेची मागणी केल्याच्या तक्रारी शासन आणि प्रशासन दरबारी झाल्या आहेत.पण अद्यापही गडलिंग यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने आणि त्यातल्या त्यात आता हे प्रकरण ताजे असतांना वरिष्ठ गडलिंग यांच्यावर काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
कारवाईचे ढोंग आणि चोरीचे सोंग – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गडलिंग यांनी कथित ‘ चिरीमिरी ‘ घेऊन अवैध वाळू जप्तीचे वाहन सोडून दिल्याची चर्चा शहरात सुरू होताच गडलिंग गांनी वाहन चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्याची तयारी चालविल्याची चर्चा आहे. ( क्रमशः)
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1