क्राइम

पत्नीवर 3 मित्रांना अत्याचार करायला लावुन केले चित्रीकरण

Spread the love

अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप ; तिघेही नामांकित कंपनीत अभियंता 

पुनावळे / नवप्रहार डेस्क

              लग्न हे पवित्र बंधन या. यानंतर  पत्नीच्या सर्व ईच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही पतीची असते. सोबतच प्रत्येक सुख दुःखात तिला साथ देने ही पतीची नैतिक जबाबदारी असते. पण काही पती असे घृणीत कृत्य करतात की ते मनुष्य आहेत की दानव असा प्रश्न मनाला पडतो. आता याच प्रकरणात पहा पतीने तीन मित्रां करवी पत्नीवर बलात्कार केल्याचा आणि चित्रीकरण करण्याचा प्रकार समोर आला आहे.

ही घटना पुनावळे येथे घडली. पीडित महिला व सर्व आरोपी हे हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नामांकित कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करत आहेत.
याप्रकरणी ३० वर्षीय पत्‍नीने ठाणे शहरातील एका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार रावेत भागात घडल्याने हे प्रकरण तपासासाठी बुधवारी (ता.१६) रावेत पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. ही घटना सप्‍टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत घडली. पुनावळे येथे हा प्रकार घडला तेव्हा सर्वजण एका पार्टीसाठी आले होते. त्यानंतर, पतीने त्याच्या मित्रांसोबत पत्नीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचे पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पतीने पत्‍नीसोबत अनैसर्गिक कृत्‍य केल्‍याचेही फिर्यादीत म्‍हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close