राज्य

जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानी च्या घराची झाडाझडती

Spread the love
अनेक आवश्यक कागदपत्रे पोलिसांच्या हाती ? 

पुणे/ विशेष प्रतिनिधी

मुंढवा येथील 40 एकर  जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा  प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी हिच्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भाड्याने राहत  असलेल्या घराची बावधन पोलिसांनी शुक्रवारी  झाडाझडती घेतली.

याकारवाई दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून तपासाला वेग देण्यात आला आहे. तसेच पिंपरी येथील तिच्या कार्यालयावरही पोलीस गेले होते. मात्र संबंधित कार्यालय बँकेने लाखबंद केल्यामुळे पोलिसांचे पथक तेथून माघारी परतले.

सध्या बावधन पोलीस कोठडीत

कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील महार वतन जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच शीतल तेजवानी हिला अटक केली होती. तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने तिची रवानगी येरवडा कारागृह येथे केली होती. त्यानंतर बावधन पोलिसांनी न्यायालयाचे प्रोड्यूस वॉरंट घेऊन येरवडा कारागृहातून तेजवानी हिला पुन्हा ताब्यात घेतले. सध्या ती बावधन पोलीस ठाणे यांच्या पोलीस कोठडीत आहे.

कोरेगाव पार्कच्या घराची झाडाझडती

तेजवानी हिचे माहेर पिंपरी कॅम्प परिसरात असून ती कोरेगाव पार्कमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. तपासाच्या अनुषंगाने बावधन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी तिच्या कोरेगाव पार्क येथील घराची सखोल झाडाझडती घेतली. या कारवाईसाठी पुणे शहर पोलिसांची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पुढील तपास सुरु

या प्रकरणात जागेच्या खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू, वय 58, राहणार भोर, याला बावधन पोलिसांनी 7 डिसेंबर रोजी अटक केली होती. सुरुवातीला त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ दिली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तारू यालाही येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close