विशेष

क्रूरकर्मा अजमल कसाब साठी तुरुंगात यांनी बनवली होती विशेष खोली 

Spread the love

खा. संजय राऊत यांच्या ‘ नरकातला स्वर्ग ‘ पुस्तकातून आले समोर 

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

          अजमल कसाब चे नाव आले की डोळ्यासमोर येतो देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई वर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला. या.हल्यात अनेक निष्पाप नागरिक आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा जीव गेला होता. या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब ला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण त्यापूर्वी त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तुरुंगातच एक विशेष खोली तयार करण्यात आली होती. ती विशेष खोली कोणी तयार केली होती त्याबद्दल जाणून घेऊ या.

 कसाबला जिवंत पकडून आर्थर रोड तुरुंगात त्याला यमसदनी पाठवण्यात आलं.दरम्यान, कसाबला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यासाठी खास तयारी करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या तरुंगांची सुरक्षा व्यवस्था तसेच कसाबच्या कोठडीची रचानाही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करण्यात आली होती. विशेष म्हणजे कसाबच्या कोठडीचे डिझाईनच खासदार शरद पवार यांच्या एका खास माणसाने केले होते.

कसाबची कोठडी कोणी बांधली?

अजमल कसाबच्या या खास कोठडीबाबत खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात सविस्तर लिहिण्यात आलंय. याच पुस्तकात कसाबच्या कोठडीचे डिझाईन नेमके कोणी केली, याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कोठडी ज्या व्यक्तीने बांधली ती व्यक्ती शरद पवार यांच्या जवळची आणि विश्वासू मानली जाते. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून माजी मंत्री जयंत पाटील हे आहेत.

संजय राऊतांच्या पुस्तकात नेमकं काय आहे?

संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात आर्थ रोड तुरुंगात असतानाचे अनुभव सांगितले आहेत. याच पुस्तकात त्यांनी कसाब आणि कसाबची कोठडी याविषयी माहिती दिली आहे. “मी  १२  नंबरच्या यार्डात होतो. आर्थर रोड जेलच्या सगळ्यांत शेवटी हे यार्ड आहे. या यार्डात शिरण्यासाठी तीन स्वतंत्र दरावाजे आहेत. चाही बाजूंनी बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ भिंती तसेच लोखंडी कवच आहे. हे का? कारण कसाब याच यार्डात होता. कसाबचे वास्तव्य असलेल्या यार्डातच मला आणि अनिल देशमुख यांना ठेवण्यात आले होते. ईथे बाहेरचा संपर्क नाही. सूर्यकिरणांची तिरीप नाही,” अशी आठवण राऊत यांनी आपल्या पुस्तकात सांगितलेली आहे.

कशी होती कसाबसाठी सुरक्षा

तसेच मी तळमजल्यावर होतो. तेथून एक जिना वर गेलेला आहे. त्यातील एका खोलीत कसाबचे वास्तव्य होते. आता ती खोली बंद आहे. त्या खोलीत आजही कसाबचे कपडे, त्याची पाठीवर लटकलेली बॅग आणि एके ४७ गन आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांची एक तुकडी होती. कसाबच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावलेले होते. तळमजल्यावर आयटीबीपीचे पथक तैनात असे. आतमध्ये मुंगीलाही शिरता येणार नाही, अशी सुरक्षा व्यवस्था होती. कसाबला त्याच यार्डातून शेवटी फाशी देण्यासाठी नेण्यात आले होते. परंतु कसाबच्या कटू आठवणींचे ठसे तिथे आजही जिवंत आहेत, अशी माहिती राऊतांनी त्यांच्या नव्या पुस्तकात दिलेली आहे.

शरद पवारांच्या त्या खास माणसाचा उल्लेख

राऊतांनी पुढे कसाबची कोठडी तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या शरद पवारांच्या त्या खास माणसाचा उल्लेख केलेला आहे. ‘कसाबच्या कोठडीची एक गंमत सांगायला हवी. कसाब आत असताना जयंत पाटील हे गृहमंत्री होते. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकांना जयंत पाटील हजर असत. त्यावेळी फावल्या वेळेत ते आमच्याशी तुरुंगातील अनुभवाबाबत गप्पा मारीत,’ असे सांगून राऊतांनी एक खुलासा केला आहे. राऊतांनी जयंत पाटलांसोबतचा एक अनुभव सांगितला आहे. ‘अहो, आता तुम्ही मजा बघताय. पण आम्ही दोघे कसाबच्याच कोठडीत होतो,’ असे संजय राऊत जंयत पाटलांना म्हणाले होते. तर यावर ‘कसाबची कोठडी मला काय सांगताय. मला ती माहिती आहे,’ असं उत्तर जयंत पाटलांनी दिलं होतं. पुढे उत्सुकतेपोटी राऊतांनी तुम्ही कसाबच्या कोठडीत कधी गेले होते, असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारला होता. याचे उत्तर देताना कसाबच्या कोठडीचे संपूर्ण डिझाईन मीच बनलवलेले आहे. माझ्यातला इंजिनिअर तिथे काम करून गेला, असं जयंत पाटलांनी राऊतांना सांगितल्याची नोंद राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केली आहे.

दरम्यान, राऊतांच्या या पुस्तकात इतरही अनेक गौप्यस्फोट आणि महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. याच कारणामुळे सत्ताधारी भाजपा, शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या पुस्तकावर टीका केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close