क्राइम

प्रायव्हेट पार्ट कापून डॉक्टरच्या पत्नीला पाठवला

Spread the love

कानपूर / नवप्रहार मीडिया 

                कानपूर देहाटच्या च्या अमरौधा प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी करणाऱ्या डॉक्टरचा  प्रायव्हेट पार्ट कापून कुरिअर ने तो डॉक्टर च्या  पत्नीला पाठवला होता. या प्रकरणात एडिजे न्यायालयाने आरोपी प्रीतीला दोषी ठरवत तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता ती तुरुंगात शिक्षा भोगत असतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला आहे. 

                     या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की कानपूर देहाटच्या च्या अमरौधा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सतीश चंद्र यांची 21 जुलै 2013 रोजी रानिया येथील राही पर्यटक निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. डॉक्टर सतीश चंद्रा एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये पोहोचले होते. सायंकाळी त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला आढळून आला होता. तर मुलगी बेपत्ता झाली होती. 

                      हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या हत्येची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन डॉ. सतीश चंद्र यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मारेकऱ्याने डॉ. सतीश चंद्र यांचे प्रायव्हेट पार्ट कापून ते सोबत नेले होते.

डॉ. सतीश चंद्र यांची निर्घृण हत्या आणि त्यांचे प्रायव्हेट पार्ट गायब झाल्यामुळे ही घटना त्यावेळी खूप चर्चेत आली होती. हा गुन्हा करणाऱ्या खुन्याचा शोध घेऊन त्याला तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांनीही आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. यानंतर पोलिसांनी डॉक्टरांसह हॉटेलमध्ये आलेल्या सीटीआय गोविंद नगर, कानपूर नगरच्या प्रीती लताला अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली होती.

प्रकरणाच्या सुनावणीनंतर, 23 सप्टेंबर 2016 रोजी, एडीजे I च्या न्यायालयाने प्रीतीला दोषी ठरवले आणि तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रीती लता न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षा भोगत आहेत. प्रीती लता सध्या लखनौ तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

              पोलिसांच्या चौकशीत प्रितीने सांगितले होते की, तिनेच डॉ. सतीश चंद्राची हत्या केली होती. यानंतर डॉक्टरचे प्रायव्हेट पार्ट सर्जिकल ब्लेडने कापून बॉक्समध्ये पॅक करून कुरिअरद्वारे पत्नीला पाठवले होते. कुरिअर सतीश चंद्र यांच्या पत्नीपर्यंत पोहोचताच पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी कुरिअर उघडताच त्यामध्ये एक चिरलेला प्रायव्हेट पार्ट सापडला. हे पाहून पोलिसही हादरले होते.

या घटनेत महिलेला 2016 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन –  मुख्य न्यायमूर्ती प्रीतिनकर दिवाकर आणि न्यायमूर्ती नलिन कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. रिमांडचा कालावधी लक्षात घेऊन न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर केला. अपिलवरील अंतिम निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला काही कालावधी लागू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. रिमांडचा कालावधी लक्षात घेऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3