सामाजिक

जैन मुनि ची हत्या करणा-याला फाशी द्या

Spread the love

 

तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा.

वरूड/तूषार अकर्ते

मंगळवार दि.१८ जुलै रोजी जैन समाजाच्या वतीने जैन मुनि ची हत्या करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयावर आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला आहे.
कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात एका जैन मुनींची हत्या झाल्याचा भीषण प्रकार दि.८ जुलै रोजी समोर आला होता. त्यांच्या भक्तमंडळींनी महाराज बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा पोलिसांकडे नोंदविली होती. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला होता. त्याने मुनींची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकून दिले असल्याचे सांगितले होते. या दरम्यान संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुनींच्या मृतदेहाचा तपास सुरू करण्यात आला होता.कटकाबावी गावाजवळ मुनींचा मृतदेहाचे तुकडे करून फेकल्याचे त्याने आधी सांगितले आणि मग मृतदेह कापडात गुंडाळून नदीत प्रवाहीत करून दिल्याचे सांगितले होते. अशा प्रकारे आश्रमातून अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन मुनींची हत्या करण्यात आली होती.
या घटनेच्या निषेधार्थ वरुड सकल जैन समाज बांधवांच्या वतीने जैन मंदिरापासून विवेक माणेकर यांच्या नेतृत्वात आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला आहे. सदर मोर्चा केदार चौक ,पांढुर्णा चौक मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला आहे.या वेळी जैन मुनि ची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, सर्व जैन मुनीना संरक्षण द्या अशी एकमुखी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जैन समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार पंकज चव्हाण यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. यावेळी देवेंद्र पोहरे, नितीन मोरस्कर, विशाल महात्मे, डॉ. प्रकाश आगरकर, विनय शहा, डॉ.अरविंद भागवतकर, किशोर विटाळकर, यशपाल डबरे, शशी उबाळे तसेच आदि जैन बांधव व समाजाच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या दिसुन आल्या होत्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close