सामाजिक

निघोज चे कृषी तज्ञ राहुल रसाळ यांना माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – निघोज येथील प्रसिद्ध कृषी तज्ञ राहुल अमृता रसाळ यांना नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कार्यक्रमात ,राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक पुरस्कार सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला .
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या निघोज येथील कृषीतज्ञ राहुल अमृत रसाळ यांना घरातूनच शेतीचे बाळकडू लाभलेले असून त्यांचे वडील प्रसिद्ध कृषी तज्ञ , प्रसिद्ध उद्योजक , निघोज परिसर कृषी फलोद्यान, भाजीपाला सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष असलेले अमृता रसाळ यांना ही शेतीची आवड असल्याने तेही शेतात नेहमी विविध प्रयोग करतात . त्यांच्या मार्गदर्शना खाली राहुल रसाळ हे शेती मध्ये विविध प्रयोग सातत्याने राबवतात . त्यांच्या निघोज येथील शेतातील सेंद्रीय पद्धतीने शेतात विविध नगदी पिके व फळबागांची शेती करतात . ते ही कमी पाण्यात सेंद्रीय शेती करण्यासाठी सेंद्रीय खते वापरून कमी खर्चात जास्त उत्पन्न घेतात . या सेंद्रीय शेतीची पाहणी करण्यासाठी राज्य व देश पातळीवरील विविध कृषी तज्ञ व कृषी शास्त्रज्ञ सातत्याने भेटी देऊन माहिती घेतात . उद्यान पंडीत सारखा राज्यातील सर्वांत मोठा शेतकरी पुरस्कार देखील त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आला आहे . त्यामुळे त्यांच्या कार्याची राज्यातील विविध संस्थांनी दखल घेऊन आज अखेर २१ पुरस्कार देवून गौरविण्यात आले .
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विविध शेतकरी व सामाजिक संस्था यांना कृषी क्षेत्रातील मानाचे पुरस्कारा मध्ये सन्मान चिन्ह , शाल देवून गौरविण्यात आले . या कार्यक्रमाला राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष आ .पाशा पटेल , आ . राजेश राठोड , निलय नाईक , राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत पाटील , माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले , सचिव दिपक पाटील , विश्वस्त डॉ . आनंद पटवर्धन , मुश्ताक अंतुले व इतर मान्यवरां बरोबर राज्यातील कृषी तज्ञ उपस्थित होते .
कृषी तज्ञ राहुल अमृता रसाळ यांच्या या मानाच्या पुरस्काराने निघोज च्या गौरवात भर पडून शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे . त्यांचे राज्यातील कृषी क्षेत्रातून कौतूक होत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close