अंजनगाव सुर्जीचे रहिवासी अनिल कविटकर यांची सोनाळा पोलीस स्टेशनच्या दुय्यम ठाणेदार पदी नियुक्ती

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी अनिल कविटकर यांची सोनाळा पोलीस स्टेशनच्या दुय्यम ठाणेदार पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दुय्यम ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.अंजनगाव सुर्जी येथील शांत स्वभावाचे तसेच मनमिळावू व्यक्तिमत्व व सर्व परिचित असलेले अनिल कविटकर यांनी पोलीस विभागात पोलीस शिपाई म्हणून जीवनाची सुरवात केली होती,त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे ते पोलीस हेड कॉन्स्टेबल,सहाय्यक उप पोलीस निरिक्षक ते पोलीस उप निरिक्षक पदी त्यांना पदोन्नती मिळाली ते अंजनगाव सुर्जी येथे पोलीस उप निरिक्षक म्हणून कार्यरत होते,त्यानंतर त्यांची बदली दर्यापूर येथे झाली आणि दर्यापूर वरुन त्यांना पदोन्नती मिळून त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील सावरखेडा पोलीस स्टेशन येथे दुय्यम ठाणेदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर ते आता सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये दुय्यम ठाणेदार म्हणून रुजू आहेत त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे अंजनगाव सुर्जी शहर व तालुक्यात कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.