क्राइम

शहरात नजर हटी दुर्घटना घटी चा आला प्रत्यय 

Spread the love
दुकान मालकाने प्रसंगावधान राखल्याने वाचली लाखोंची रोकड आणि दागिने 
पुलगाव / प्रतिनिधी 
             जनतेला तुमचे पैशे पडले आहे. किंवा वाहनाला काही तरी झाले आहे. किंवा कपड्याला मागून काही लागले आहे. असे बोलून त्यांचे लक्ष विचलित करायचे आणि त्यांच्या हातात , वाहनात असलेली दागिन्यांची अथवा पैशाची पिशवी घेऊन पलायन करायचे. असे प्रकार नेहमीच घडत असतात. लक्ष दुसरीकडे वळवून पैशाने आणि दागिन्यांचे भफलेली बॅग घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न दुकानदाराच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना पुलगाव येथे घडली आहे.
पुलगाव येथील महावीर चौकातील प्रमोद रामभाऊ काळे या सराफाच्या दुकानातील ही घटना आहे. सकाळी आठ वाजता दुकानसमोर एक पिवळा लेडीज गाऊन घालून एक युवक आला. त्याने दुकानातील कुलूपमध्ये फेविक्विक टाकत एक माचिसची काडी टाकली व तो निघून गेला. जेणेकरून दुकानदार आल्यावर त्याला कुलूप उघडायला वेळ लागेल.
दहा वाजता कपडे बदलून युवक त्याच ठिकाणी परत आला. दुकान मालक श्रेयस काळे हा दहा वाजताच्या सुमारास दुचाकीने बॅग घेऊन आला व बॅग दुचाकीवर लटकावून दुकानाचे कुलूप उघडत होता. मात्र दुकानाचे कुलूप हे उघडत नव्हते याचदरम्यान त्याची दुचाकीला लागून असलेली बॅग चोरट्याने संधीचा फायदा घेत पळवली.
..बॅग पळवून युवक आपल्या साथीदारसोबत दुचाकीवरून जातं असतांना श्रेयसला बॅग पळविल्याचे लक्षात आले. श्रेयसने आरडाओरड करत चोरट्यांकडून बॅग हिसकावली मात्र चोरटे
घटनास्थळावरून पसार झाले. या बॅगेत सोने व रोख असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल होता श्रेयस यांच्या सतर्कतेने मोठी चोरीची घटना टळली. ही घटना परिसरातील सिसिटीव्हीत कैद झाली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close