आध्यात्मिक

श्रीसंत वासुदेव महाराज पायदळ पालखीचे परभणीत जंगी स्वागत!

Spread the love

 

ह भ प वासुदेवरावजी महल्ले यांचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न!

बाळासाहेब नेरकर कडून / हिवरखेड

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट जिल्हा अकोला च्या वतीने श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पर्यंत श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन दिनांक 18 जून 2019 ते 21 जुलै 2024 पर्यंत करण्यात आले आहे. पालखीचे परभणी जिल्ह्यात शहरात गावागावात चौका चौकात रांगोळ्या काढून फटाके फोडून तसेच चहा नाश्ता फळ स्नेहाभोजन देऊन जागोजागी भक्ती भावाने स्वागत करण्यात आले . परभणीत पोचल्यावर मुक्कामाच्या ठिकाणी श्री मंगल कार्यालय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर ह भ प वासुदेवरावजी महल्ले पाटील यांच्या एक जुलैला 65 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सर्व वारकरी व श्री संत वासुदेव महाराज भक्त मंडळी च्या वतीने भव्य दिव्य सत्कार करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. तसेच त्यांना भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले तसेच यावेळी पालखीत सहभागी असलेले वारकरी तथा समाजसेवक गजानन हरणे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचाही सत्कार सन्मान करण्यात आला त्याचबरोबर सारंगधर गावंडे यांचाही गौरव करण्यात आला गरीब मुलींना वस्त्रदान करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून.पालखीचे मार्गदर्शन ह भ प वासुदेव महाराज महल्ले, ज्येष्ठ समाजसेवक तथा वारकरी गजानन हरणे वारकरी सारंगधर गावंडे,.ह भ प अंबादास मानकर पालखी सोहळा व्यवस्थापक,ह भ प महादेवराव ठाकरे उपाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ह भ प गजानन दुधाट, अनिल कोरपे. यांच्या सह विश्वस्त मंडळी मंचावर उपस्थित होती. दिनांक 29 जून 2024 ते 2 जून 2024 पर्यंत परभणी जिल्ह्यांमध्ये पालखीचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले .त्यामध्ये जवळाबाजार येथे अशोकराव शेळके यांनी येथे सकाळी पालखीचे आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात केले. त्यानंतर त्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला . महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संध्याकाळी सहा वाजता हट्टा संस्थान येथे शंकराप्पा उजवनकर यांनी भव्यदिव्य असे पालखीचे स्वागत केले. त्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचा समारोप वारकऱ्यांना स्नेहभोजन देऊन करण्यात आला. दिनांक एक जुलै ला सकाळी श्री क्षेत्र त्रिधारा संस्थान येथे निरंजन वट्टमवार यांनी पालखीचे भव्य स्वागत केले त्यानंतर त्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला नंतर वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी परभणी येथे पायदळ वारीचे शहरांमध्ये चौका चौकात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले .जागोजागी पालखीतील वारकऱ्यांना फराळ चहा नाश्ता देण्यात आला. तसेच रांगोळी व फटाके फोडून पालखीचे स्वागत करण्यात आले. संध्याकाळी परभणी येथे येथे नितीन वट्टमवार व परिवाराच्या वतीने यांनी पायदल वारीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. कीर्तनानंतर या ठिकाणी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता महाप्रसादांनी करण्यात आली. अशाप्रकारे आज पालखीने 15 दिवसाच्या प्रवास पूर्ण केला. हा पालखी सोहळा यशस्वी करण्याकरता सर्व विश्वस्त मंडळी त्यामध्ये ह भ प वासुदेव महाराज महल्ले, माधवराव ठाकरे, गजानन दुधाट, अंबादास मानकर, श्रीराम कोरडे, ज्ञानेश्वर नराजे, बाळकृष्ण वाकोडे, नागोराव बावस्कर, माधवराव बोलोकार, संपर्कप्रमुख विलास गीते, संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ त्यामध्ये बाबाराव बिहाडे, पुरुषोत्तम लाजुरकर, रवींद्र वानखडे, मोहनराव जायले, अविनाश गावंडे, डॉ. अशोक बिहाडे, सौ सुनंदाताई आमले, जयदीप सोंनखासकर, प्रा.गजानन चोपडे, अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, एडवोकेट शिरीष ढवळे, दिलीप हरणे, केशवप्रसाद राठी आदीसह संस्थेचे अनेक पदाधिकारी ही पायदळवारी यशस्वी करण्याकरता प्रयत्न करीत आहे तसेच त्या त्या जिल्ह्यातील श्रीसंत वासुदेव महाराज भक्तगण हे सुद्धा वारी यशस्वी करण्याकरता प्रयत्न करीत आहे . अशी माहिती वारीमध्ये सहभागी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close