खोक्या भोसले याचा आणखी एक कारनामा उघड

पार्श्वभागात पेट्रोल टाकून केली होती मारहाण
प्रतिनिधी /बीड
वाल्मिक कराड गॅंग चे कारनामे समोर आल्यावर सतीश भोसले उर्फ खोक्या याचे कांड समोर येत आहेत. या खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आला असून तो किती क्रूर आहे, याची माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीला नग्न करून त्याच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. पीडित व्यक्तीने स्वत: समोर येत याची माहिती दिली आहे.
बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. बीडमध्ये आपल्या कृत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न खोक्याने केला असल्याचे दिसून आले आहे. आता खोक्याच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. खोक्या उर्फ सतीश भोसले याने नग्न करून मारहाण केलेले बुलढाणा जिल्ह्यातील मेहर खेड गावचे पोकलँड ऑपरेटर कैलास वाघ हे आता समोर आले आहेत. खोक्याने कशाप्रकारे त्यांना मारहाण केली हे त्यांनी स्वतःच सांगितलं आहे.
कैलास वाघ यांनी सांगितले की, पोकलेन ऑपरेटर म्हणून आपली उचल संपली होती. तसेच आपल्याला त्यांच्यासोबत काम करायचे नव्हते. आपण पुढील पैसे मागितले होते. मात्र, त्यांनी देण्यास नकार दिला आणि त्यानंतर जबरदस्तीने गावातून पकडून शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी येथील एका पत्राच्या शेड समोर नेण्यात आले. तिथे मला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली असल्याचे वाघ यांनी सांगितले.
हा सगळा प्रकार एका वर्षी झालेल्या दिवाळी दरम्यानचा असल्याची माहिती त्यांनी दिली. खोक्याने आपल्याला एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले आणि तिथे मारहाण करून नग्न करण्यात आले. त्यानंतर पार्श्वभागामध्ये पेट्रोल टाकून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. मला तिथे साधारण पंधरा दिवस डांबून ठेवले होते, असा क्रूर प्रसंग कैलास वाघ यांनी सांगितलेा. या प्रकरणात सतीश भोसले सोबत तींतरवणी येथील माऊली खेडकर नावाच्या व्यक्तीचेही नाव त्यांनी घेतले आहे. ही घटना दोन-अडीच वर्षापूर्वीची असल्याचे त्यांनी सांगितले.