न्यु ईरा हायस्कुल अकोला येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
अकोला / प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्था अकोला द्वारा संचालित न्यु ईरा हायस्कुल अकोला येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.महेश ठोके सर तर प्रमुख अतिथी म्हणून मधुकर पुरी सर तसेच मडावी मॅडम,देशमुख मॅडम , श्री.अनंता कुलकर्णी तर पालक प्रतिनिधी म्हणून सौ. बोंद्रे मॅडम ह्या उपस्थित होत्या.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मल्यार्पण करण्यात आले. यानंतर मोहन गोपणारायण या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच वर्ग सहावी च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत एका प्रसंगावर नाटिका सादर केली. त्यांनतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. महेश ठोके सर, पुरी सर तसेच देशमुख मॅडम यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे विचार विद्यार्थांना सांगितले. तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राठोड सर यांनी केले.
यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.