टिप्पर च्या धडकेत एक मृत व एक गंभीर जखमी .
वाडी ( प्र . ) : दवलामेटी रोडवर फिल्टर कॉलनी हनुमान मंदीरा समोर टिप्पर व पल्सर गाडी च्या अपघातात एक युवक मृत झाला असून एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी १२.५ चे दरम्यान घडली .मृतकाचे नाव शरद रमेश ब्राम्हणे वय ३९ असून जखमी युवक अनुज शिवप्रसाद लांडगे वय १३ वर्ष असून दोघेही वडधामना येथील रहिवाशी आहेत . प्राप्त माहिती नुसार मृतक शरद ब्राम्हणे व अनुज लांडगे हे वर नमुद घटना तारीख व वेळ ठिकाणी मृतक व जखमी हे पल्सर दुचाकी गाडी क्रमांक एम एच ३१ डीटी ४३७९ याने प्लॉटची मोजणी करून देण्या करिता लावा या गावात गेलेले होते ते प्लॉटची मोजणी करून परत घराकडे येत असताना टिप्पर क्रमांक एम एच ४० बी एल ४४१० चे चालकाने दुचाकी गाडीला पाठीमागून धडक दिल्याने पल्सर चालक जागीच मरण पावला व मागे बसलेला इसमाला जबर दुखापत झाली . फिर्यादी रमेश काशीराम ब्राम्हणे याचे रिपोर्ट वरून
कलम- 168/2024 कलम 304(अ),279,337,338 भादवी सह कलम 134,177 मोटर वाहन अधिनियम
सदरच्या गुन्हा टिप्पर चालका वर दाखल करून पुढील तपास वाडी पोलीस करित आहेत .
परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विनोद चाफेकर, पंकज तिघरे व ईतर नागरिकांनी हे घटना स्थळ धोकादायक असून इथे नेहमीच अपघात होत असतात तरी रस्त्याला दोन्हो दिशेने ब्रेकर ची अतिशय गरज आहे. तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.