भंडारा कलेक्टर ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट: कोणतीही जीवित हानी नाही
भंडारा नवप्रहार प्रतिनिधी / हंसराज
भंडारा: भंडारा कलेक्टर ऑफिसमध्ये आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर ऑफिसमध्ये धूर पसरला, परंतु सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.डीपी जळाली, परंतु तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे मोठी धावपळ करावी लागली नाही. आणी सगळं वेळेवर नियंत्रण करणे शक्य झाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी पोहोचल्या. कोणतीही जीवित हानी झाली नाही आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. आग नियंत्रणात आल्यामुळे कलेक्टर ऑफिसमधील परिस्थिती पुन्हा स्थिर झाली आहे. आग लागल्यानंतर कार्यालयातील विद्युत उपकरणांमध्ये झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने विद्युत उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याची सूचना दिली आहे. सध्या, कार्यालयातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून, कामकाज लवकरच पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.