लग्न करत नसल्याने आणि करु ही देत नसल्याने केली हत्या
कानपूर / नवप्रहार डेस्क
येथील जिम ट्रेनर ने व्यावसायिकांच्या पत्नीची हत्या केली होती. आणि मृतदेह कलेक्टर च्या बंगल्याच्या आत पुरला होता. चार महिन्या नंतर पोलिसांनी हत्येचा छडा लावत जिम ट्रेनर ला अटक केली आहे. व्यावसायिकांची पत्नी आणि जिम ट्रेनर मध्ये अनैतिक संबंध होते. ती त्याच्या सोबत लग्न ही करत नव्हती आणि त्याला करू सुद्धा देत नव्हती. म्हणून त्याने तिची हत्या केल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे.
विमल सोनी हा जिम ट्रेनर असून तो मिस्टर कानपूर आणि मिस्टर यूपी स्पर्धाही जिंकला आहे. त्यानं मिस्टर इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता. जिममुळे विमल सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. त्याच्या जिममध्ये ट्रेनिंगसाठी लोक गर्दी करतात.
जिम ट्रेनर विमलच्या सोशल मीडियावर पुरुषांपेक्षा महिला मित्रांचीच संख्या जास्त होती. ४ महिन्यापूर्वी व्यावसायिकाची पत्नी एकता गुप्ता यांची हत्या केल्यानंतर जिम ट्रेनर विमलने त्याचे सोशल मीडिया अकाउंट बंद केले होते. जिम ट्रेनिंगवेळी ट्रेनर विमल सोनी आणि विवाहित असलेल्या एकता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांमध्ये जवळीक वाढली. शेवटी विमलने एकताची हत्या केली आणि तिचा मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारात खड्डा खोदून गाडला. मात्र हे प्रकरण चार महिन्यांनी उघडकीस आलं.
पोलिसांनी अटक केल्यानंतर विमलने तपासावेळी सांगितलं की, एकता त्याच्या प्रेमात पडली होती. एकता माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मला दुसऱ्या कोणाशी लग्न करून देत नव्हती. यामुळे तिला मारावं लागलं.
विमल सोनीने पोलिसांना सांगितलं की, २०१०च्या आधी मिस्टर कानपूर बॉडी बिल्डर पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर मिस्टर यूपी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. २०१० मध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेतही भाग घेतला. पण पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. यानंतर कानपूरला एका हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं.
कानपूरमध्ये माजी जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये यश मिळवल्याचं समजलं तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी बंगल्याच्या बाजूला असलेल्या ऑफिसर्स क्लबमध्ये जिम ट्रेनर म्हणून नोकरी लावली. पण काही काळाने अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्यानं त्याला हटवलं होतं. यावेळी पुन्हा एकदा एका आयएएस अधिकाऱ्याचं नाव सांगत त्याने ग्रीन पार्कमध्ये नोकरी मिळवली.
विमल सोनीने एकता गुप्ताचा ग्रीन पार्कच्या स्टेडियममध्ये पार्किंगमध्ये उभा असलेल्या गाडीतच हत्या केली. हत्या करण्याआधी तिला नशेची गोळी दिली होती. यामुळे एकता बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्या गळ्यावर एक ठोसा मारला आणि दोरीने गळा आवळला. त्यानंतर मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारात नेऊन गाडला.