कौडगाव जांब ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे विकासकामे खुंटले -ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब धिवर
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांना निवेदन
प्रतिनिधी / नगर – नगर तालुक्यातील कौडगाव जांब ग्रामपंचायतीला आठवड्यातून दोन दिवस ग्रामसेवक असल्यामुळे गावाची व ग्रामस्थांची विकास कामे आडून पडत आहेत. गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळावा असे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांना निवेदन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर म्हणाले की, गावाला आठवड्यातून दोनच दिवस ग्रामसेवक येत असल्याने गावातील अनेक विकास कामे होत नाही. तसेच ग्रामस्थांचे अनेक कामांचा वेळ लागत असल्याने त्यांचे कामे पुर्ण होत नाहीत. तसेच आठवड्यातून दोन ग्रामसेवक येत, परंतु विविध शासकीय कामांमुळे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कौडगाव जांब ग्रामपंचायतीला पुर्ण वेळ ग्रामसेवक मिळावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी सांगितले की, गावाला पुर्णवेळ ग्रामसेवक देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करु. तसेच गावातील अनेक समस्या सोडविण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
–