न.प.शाळा क्रं.५ येथे मेरी माटी,मेरा देश अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
न.प.शाळा क्रं.५ मधे स्वातंत्र्याच्या ७६ व्या अमृत महोत्सव निमित्ताने १३ ते १५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यायना सोबतच देशाच्या मातीवर प्रेम व देशसेवा करणा-या जवाना बद्ल कृतज्ञता आणि आत्मिक जनजागृती व्हावी यासाठी हा कार्यक्रम होता. १३ ता.ला माता व पालक कार्यक्रमा अंतर्गत सौ. सविता चौरागडे यांचे हस्ते सकाळी ७ वा ध्वजारोहण करण्यात आले तसेच पंचप्राण शपथ घेन्यात आली.१४ ता.ला रमेश घरडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व स्वातंत्र्य अमृत कलश घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली.
१५ ऑगस्ट रोजी माजी सैनिक करणं वाढई हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शाळा पुर्वतयारी अंतर्गत कार्यरत मातापित्यांचा सत्कार घेन्यात आला. या कार्यक्रमात आर्य वैश्य समाज जिल्हाध्यक्षा सौ साधनाताई माडूरवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.आरती राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शाळा मुख्याध्यापिका सिंधूताई सिडाम, शिक्षक ज्ञानेश्वर गावंडे,गजानन बंडीवार,पुर्णीमा टापरे,विद्या वंजारे,भारती मनवर,स्विटी कपिले, अंगणवाडी सेविका वर्षा कोमावर,विभा कर्णेवार,रूपाली मेश्राम,निता मददार, तसेच अनुसया मन्ने यांचे कार्यक्रम प्रसंगी मोलाचे सहकार्य लाभले.