हटके

कलियुग ! घोर कलियुग…. बाप आणि मुलीने केले लग्न 

Spread the love

                     बाप लेकीचं नातं काय असतं हे बाप आणि लेकीलाच माहीत असतं. कुटुंबासाठी राबराब राबणाऱ्या बापाच्या कष्टाची जाणीव लेकीला असते. त्यामुळेच लेकीच्या लग्नाच्या वेळी बाप एकट्यात हमसून हमसून रडत असतो. कारण त्याला माहित असत की आता आपली काळजी घेणारी व्यक्ती सासरी जात आहे. आणि ती कधी कधीच माहेरी येईल. पण सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक तरुणी तिने तिच्या वडिलांशी लग्न केल्याचे सांगत आहे.सोबत ती लोक काय म्हणतील ? याची तिला चिंता नसल्याचे म्हणत आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना कलियुग नव्हे तर घोर कलियुग आल्याचे म्हटले आहे.

काय आहे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये

‘ या व्हिडिओत 24 वर्षाची म्हणते, हे माझे वडील  (50) आहे आणि मी त्यांच्याशी लग्न केले आहे. समाज आमच्या नात्याला मान्यता देणार नाही. परंतु आम्ही लग्न केले आहे, कोणी आमचे नाते मान्य करावे किंवा नाही? त्याच्याशी आम्हाला काहीच घेणे देणे नाही. जेव्हा वडिलांना विचारले जाते, काय ही तुमची मुलगी आहे? ते होकारार्थी उत्तर देत, यामध्ये अडचण काय आहे? असा प्रश्न विचरतात. वडिलांशी लग्न करताना तुला लाज नाही वाटली? असा प्रश्न त्या मुलीला विचारला. त्यावेळी मुलीचे वडील म्हणतात, तुम्ही कोणत्या जगात राहत आहे? कशाला लाज वाटायची?

व्हिडिओ खरा की खोटा?

मुलीला वय विचारल्यावर ती 24 वर्षांची असल्याचे सांगते. तिचे वडिलांनी त्यांचे वय 50 वर्ष असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओ बनवण्याचे कारण विचारले असता, आम्हाला जगाला सांगायचे आहे, असे उत्तर मुलीने दिले. कारण आमच्या मागे लोक अनेक चर्चा करत असतात. जयसिंग यादव यांनी X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे. ही TikTok ची क्लिप आहे. यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा? असा प्रश्न आहे.

 

 

 

अनेक युजरने हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत मनोरंजनासाठी बनवल्याचे म्हटले आहे. जर हा व्हिडिओ खरा असेल तर अशा लोकांना मानसिक उपचाराची गरज आहे, असे काही युजरने म्हटले आहे. वडील आपल्या मुलीसोबत लग्न कसे योग्य ठरवू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

कायदेशीर अडचण

दरम्यान, हा व्हिडिओ खरा असेल तर भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता आणि हिंदू विवाह कायद्यानुसार वडील आणि मुलगी यांच्यात लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close