“माझे स्टेशन स्वच्छ- सुंदर “हा संदेश देत.* *चांदुर रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम
श्रमदान करण्यासाठी विविध संघटनेचा सहभाग
चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या पुढाकाराने
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भारताला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांच्या कार्याला समोर ठेवून.” स्टेशन माझे स्वच्छ – सुंदर”असावेच ह्या ध्यासपूर्तीने दिनांक 24 जुलै रोजी सकाळी9:00 वाजता चांदुर रेल्वे स्टेशनवर गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, पत्रकार व इतर लोकांबरोबर श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात आला.
स्टेशन प्रबंधक दीपिका वाजपेयी त्यांच्या पुढाकाराने चांदुर रेल्वे स्टेशन परिसर आज शहरातील विविध संघटनेच्या व समाजसेवकाच्या सहकार्याने “माझे स्टेशन स्वच्छ सुंदर” या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा यांच्या फोटोचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करत पत्रकार बंडू आठवले, प्रवीण शर्मा, अतुल उज्जैनकर,माजी नगरसेवक बच्चू वानरे व राऊत यांनी मोलाचे उपस्थितांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका वाजपेयी तर आभार प्रदर्शन राऊत यांनी केले. यावेळी स्टेशन प्रबंधक दीपिका वाजपी, उप स्टे.प्र. देवेश वाजपेयी, SSE(Big ) अरविंद कुमार SSE(Piway ) बी. राऊत, अरुण वाघ, केशव मेश्राम, अमोल पगारे, पत्रकार प्रवीण शर्मा, बंडू आठवले, राजेश सराफी, अभिजीत तिवारी, प्रा.अतुल उज्जैनकर, अमोल ठाकरे, मनोज गवई, प्रकाश रंगारी, पप्पू कोटेजा, मंगेश बोबडे, दादाराव खरबडे, मनोज ढोकणे, सोनल, विकास, मनोज पाटील, प्रतीक, अजिंक्य, भूषण रंगारी , पाटील, चंपू, कुंदिले, नरेंद्र तसेच वसंत जोग हे पत्नीसह उपस्थित होते.