सामाजिक

लोकहितकारक प्रश्न घेऊन सिटीझम फोरम नागरिक मंच ने घेतली शरद पवार यांची भेट.

Spread the love

 

शेतकरी, मजूर, कामगार ,युवा बेरोजगारांचे प्रश्न याकडे वेधले लक्ष.

महाराष्ट्रातील लोकहीतकारक प्रश्नांना प्रथम प्राधान्य देऊन सोडवू -शरद पवार

चंद्रपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्रात सातत्याने वारंवार सुरू असलेल्या राजकीय घडामोडी व यात सर्वसामान्यांचे होत असलेले हाल, अवकाळी पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ तर कधी वातावरणातील बदल परिणामी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणा नुकसान ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या विविध आव वाचून उभे असलेल्या शेतकऱ्यांचे , कामगारांचे ,बेरोजगार युवकांचे प्रश्न याकडे सातत्याने राज्यकर्त्यांकडून होत असलेला दुर्लक्षितपणा यासह सर्व विविध प्रश्न घेऊन सिटीझन फोरम- नागरिक मंच च्या माध्यमातून महाराष्ट्र सिटीझम सचिव हर्षल हिवरखेडकर यांच्या मार्गदर्शनात कांचन इंगळे, राजेंद्र मेश्राम ,प्रेमदास रामटेके, रामराव गाडेकर, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष तथा नागरिक मंच किशोर पत्तीवार, संदीप कोनंमवार चंद्रपूर आदींनी शिष्टमंडळासहित भारत देशाचे अभ्यासू मुरब्बी खंबीर ज्येष्ठ नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथील विशेष बैठकीत भेट घेऊन सर्वसामान्यांचे लोकहितकारक प्रश्नांकडे लक्ष वेधले. सदर सविस्तर भेटीत महाराष्ट्रातील विविध विषयासहित विदर्भातील अनेक रखडलेल्या प्रश्न संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येऊन सदर प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात स्वतः जातीने दखल घेऊन लोकहितकारक प्रश्न अग्रक्रमाने सोडवू असे सिटीझम फोरम शिष्टमंडळाला भेटीत आपले मनोगत व्यक्त केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close