राजकिय

काकांची पुतण्याला ‘ महाले ‘ पछाड 

Spread the love

बारामती / नवप्रहार डेस्क 

                राज्यात मागील काही दिवसांपासून ‘ इनकमिंग आणि आऊट गोइंग ‘ चा खेल खेळ सुरू आहे. कोणाच्या पक्षाला कोण कधी भगदाड पडेल याचा काही नेम नाही . लोकसभे नंतर पुन्हा फोडाफडीच्या राजकारणाला सुरवात झाली आहे. यावेळी काकांनी पुतण्याला ‘ महाले ‘ पछाड दिली आहे.

राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. नानासाहेब महाले यांनी आपल्या शंभर कार्यकर्त्यांसोबत आज बारामतीमधील गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नानासाहेब महाले हे राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष आहेत, मात्र त्यांनी आज राष्ट्रवादीला रामराम करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होणार आहेत. तसेच ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नाराज भाजप नेते राजू शिंदे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे, राजू शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्याच्या मनधरणीनंतर देखील पक्षाचा राजीनामा दिला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close