राजकिय

पवारांनी तर नाही पण ठाकरे यांनी भाकरी फिरवली

Spread the love

ठाणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                         आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्था, लोकसभा ,विधानसभा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता सगळ्याच पक्षांनी पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा ठाणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगर येथील कार्यकारणी बरखास्त केली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर नाही पण राज ठाकरे यांनी भाकरी फिरवल्याची चर्चा रंगत आहे.

राज ठाकरे यांनी आज बदलापूर आणि उल्हासनगरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोरच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढाच वाचला.

राज ठाकरे यांनी या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर तडकाफडकी निर्णय घेत बदलापूर आणि उल्हासनगरची कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली. पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.


दरम्यान, बदलापूर आणि उल्हासनगरची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नवी कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले. त्यामुळे आता नव्याने कुणाला, कोणत्या पदाची संधी मिळणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close