पत्रकार दीनानिमीत्य घाटंजीत भव्य रक्तदान शिबीर तथा व्याख्यान कार्यक्रम आयोजित
बालकांना, यूवकांना व्यसनापासूर परावृत्त करण्यासाठी 9 वर्षाचे माऊली महाराज जाहूरकर यांचे व्याख्यान
घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन अर्थात पत्रकार दिनानिमित्त दी. 6/1/24 रोजी घाटंजी तालुका पत्रकार संघटनेच्या वतन पत्रकार हा समाजाचाच एक भाग असून आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदांन्त हेतूने विवीध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात साकाळी घाटंजीतील जयस्तंभ चौक येथे शहीदांना मान वंदना करत ‘रक्तदान श्रेष्ठ’ म्हणून दानभव्य रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. तदनंतर सायंकाळी तालुक्यातील सर्व विभागातील मान्यवर अधिकार उपस्थितीत समाजातील शैक्षणिक, सामाजिक, राजकिय क्षेत्रात विशेष उलेखनिय कार्य करणा-या व्यग्तिचा सत्कार तथा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त निवडक शेतकरी कुटूबांतील व्यग्तिचा सांत्वन पर मदतीचा हात देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सायंकाळी 7 वा आळंदी देवाची येथिल बाल किर्तनकार जिटीव्ही प्रसिद्ध ह. भ. प. माऊली महाराज जाहूरकर (वय ९) यांचे समाज प्रबोधन व बालक, यूवकास व्यसना पासून परावृत्त करण्यासाठी चा कार्यक्रम घेण्यात येत आहे.सदर कार्यक्रम प्रसंगि तालुक्यातील बालक, यूवक, तथा समस्त नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहण घाटंजी तालुका पत्रकार संघटनेच्या वतिने करण्यात आले आहे.
0000000000000