राज्य मराठी पत्रकार संघाचे सोमवारी अकोले येथे राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – महाराष्ट्र राज्य मराठी संघ पत्रकार यांच्या वतीने यावर्षी मानाचा वारकरी समाजभुषण पुरस्कार नगर दक्षिण चे नूतन खासदार डॉ .निलेश लंके यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार अकोले तालुक्यातील बारी येथील कळसूबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया चे मुख्याध्यापक राजेश चंद्रकांत जाधव , तर उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार शिवाजीराव नामदेवराव नाईकवाडी यांना जाहीर करण्यात आला आहे .
हा पुरस्कार सोहळा सोमवार दि . ८ रोजी अकोले येथील इंदोरी च्या मातोश्री लाॅन्स येथे आयोजित करण्यात आला आहे ,तरी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे , उत्तर महाराष्ट सचिव अनिल रहाणे , जिल्हाअध्यक्ष सोमनाथ काळे ,जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे , अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले , तालुका कार्याध्यक्ष दत्ता जाधव ,सचिव हरीभाऊ फापाळे व पदाधिकारी यांनी केले आहे .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात . यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले जाते .