जीवघेणा नॉयलॉन मांजा १७ वर्षीय मुलीचा गळा चिरला
लाखनी येथील घटना
लाखनी : नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील अनेक ठिकाणी सर्रासपण नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. नायलॉन मांजाने गळा कापला गेल्यामुळे १७ वर्षाच्या मुलीला ८ टाके लागले आहेत. ही धक्कादायक घटना दि. १४ जानेवारी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास लाखनी येथील तलाव वॉर्डात घडली. ईशा शिवदास गायधने, रा. लाखनी असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
लाखनी शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने एका १७ वर्षीय चिमुरड्याला तब्बल ८ टाके लागले आहेत .मल्हार नितीन राऊत असे या सात वर्षाच्या मुलाचे नाव आहे. मकरसंक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते. यात नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बंदी असतानाही मांजाची विक्री होत आहे. यात पशुपक्षी तर जखमी होत आहे मात्र आता याचा सर्वाधिक दुष्परिणाम मानवावरही दिसून येत आहे.
याच नायलॉन मांजामुळे लाखनी येथील ईशा गायधने १७ वर्षीय मुलीचा गळा चिरला गेला. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिच्या मानेच्या डाव्या बाजूला जबर जखम झाल्याने आठ टाके लावण्यात आले. या ती सुदैवाने बचावली. नायलॉन मांजा बंदीबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते.