सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते अरविंद बाभळे यांना जीवन गौरव पुरस्का

Spread the love

अव्दैत विदर्भ करडंकच्या माध्यमातून दिला जाणारा यावर्षी चा अव्दैत जीवनगौरव पुरस्कार२०२४हा पुलगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिभावान नाट्य तपस्वी व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई -महाराष्ट्र शासनाचे सदस्य श्री अरविंद बाभळे यांना संस्थेच्या वतीने ४मे रोजी सकाळी दहा वाजता यथोचित रित्या प्रदान करण्यात आला आहेत..
सिपना इंजिनिअरिंग येथील अरविंद उर्फ भाऊ लिमये नाट्यगृह अमरावती येथे उदघाटन प्रसंगी त्यांचा आगळया वेगळ्या पद्धतीने गौरव करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी नाट्यकर्मी हरीश इथापे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त सदानंद बोरकर, अमरावती चे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता साहेब, अँडव्होकेट प्रशांतभाऊ देशपांडे, शेखर पटले, तसेच ज्येष्ठ कलावंत आवर्जून पणे उपस्थित होते.
यावेळी वर्षा बाभळे यांनी अरविंद बाभळे यांच्या संपूर्ण संघर्षमय व खडतर ४२वर्षाच्या नाट्य प्रवासाची थोडक्यात उकल करून, प्रेरणादायी माहिती सांगितली…त्यावेळी कलाविष्कार तर्फे सिनेनाट्य कलावंत अविनाश शहागडकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमानंतर संपूर्ण विदर्भातील तेरा नाट्य स्पर्धेच्या कलाकृतीचा आस्वाद दोन दिवस अमरावती येथील नाट्य रसिकांनी भरभरून घेतला. हा पुरस्कार मिळविल्याने समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल बाभळे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहेत. त्यांच्या या कामगिरीचे अखिल तेली समाज संघटना नागपूर,प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर, प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा, अमरावती, संताजी समाज विकास संस्था(अमरावती),संताजी , बहुद्देशिय संस्था आर्वी,रावराठोड संघटना नागपूर, विदर्भ तैलिक महासभा इत्यादी संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहेत. भाविवाटचालिसाठी अरविंद भाऊसाहेब यांना शुभेच्छा.
*मुख्य* *संकलक*
*अविनाश* *टाके*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close