अमरावती जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे संपन्न झाली
पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेत आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे संपन्न झाली.
चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे समोर प्रामुख्याने धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री प्रताप दादा अडसड यांनी आपल्या मतदार संघातील विविध प्रश्न उपस्थित केले. तात्काळ सर्व प्रश्नांची मागणी नीकाली लावण्या संदर्भात, संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आदेश दिले.
अमरावती जिल्हा आढावा बैठक पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेत आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे संपन्न झाली. यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या बाबत आमदार प्रतापदादा अडसड यांनी विविध मागण्या केल्या. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात विद्युत डीपी बाबत समस्या उद्भवत असल्यामुळे शेतकऱ्यांना डिपींची व्यवस्था करून देण्यासंदर्भात मागणी केली. सोबतच उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात उद्भवत असल्यामुळे
त्यावेळी शासनाकडून शेतकऱ्यांच्या विहिरीचे अधिग्रहण केले जाते. परंतु अधिग्रहित केलेल्या विहिरीचे अद्यापही शासनाकडून निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे त्या संदर्भात शेतकऱ्यांची मागणी केली असल्याने त्यांना निधी उपलब्ध करण्यासंदर्भात यावेळी आमदार प्रताप दादा अडसड यांनी मागणी केली. शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना. जसे संजय गांधी निराधार योजनेचा निधी पंतप्रधान किसान योजनेचा निधी हा बँक प्रशासना- कडून होल्डवर ठेवल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांचे खाते होल्ड वर ठेवल्या – मुळे शेतकऱ्यांना तो मिळत नसल्याने शासनाला या संदर्भात सूचना देऊन, शासनाकडून मिळणारा निधी होल्ड वर न ठेवता त्यांना तो त्वरित देण्यात यावा.
ही मागणी सुद्धा करण्यात आली. मान्सून आला असून आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना डीएपी रासायनिक खतांचा तुटवडा भासणार नाही. याकरिता संबंधित विभागाने पूर्व नियोजन करून याबाबतीत योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार प्रतापदादा अडसड यांनी आजच्या जिल्हा आढावा बैठक मध्ये मागणी केली. सोबतच घरकुल योजनेमद्ये पहिल्या टप्प्यातील निधी घरकुलधारकांना मिळालेला असून, दुसरा व तिसरा टप्पा अद्यापही मिळालेला नसल्यामुळे बराचश्या घरकुल धारकांनी याबाबत आपल्याकडे मागणी केली असता. हा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावा. असे या आढावा बैठकीत आ.प्रताप दादा यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापना बाबत मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता नसल्यामुळे यावरती निधी उपलब्ध करण्याची सुद्धा यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी मागणी केली.