जवाहरनगरात संताजी जगनाडे पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी
उखाणा घ्या उखाणा, म्हणत महिलांनी आणली रंगत
दोन दिवसीय विविध उपक्रमासह हळदी-कुंकू कार्यक्रमातून आली रंगत
जवाहरनगर :– संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी विविध धार्मिक,सांस्कृतिक, व बौद्धिक कार्यक्रमासह हळदी कुंकू कार्यक्रमानी श्री संताजी मंडळ व संताजी महिला मंडळ,जवाहरनगर,सावरी, कोंढी च्या संयुक्त विद्यमाने आयुध निर्माणी जवाहरनगर वसाहत परिसरातील बहुउद्देशिय सभागृह ( एम. पी. हॉल) येथे दोन दिवसीय २१ व २२ जानेवारीला साजरे करण्यात आले.
२१ जानेवारीला सकाळी ११ ते ५ वाजता संताजी जगनाडे महाराज तैलचित्र व जीवन गाथेवर आधारित चित्रकला स्पर्धा,प्रोजेक्ट प्रदर्शनी स्पर्धा,रांगोळी स्पर्धा ,सायंकाळीं ७ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम व सनेहभोज.दिनांक २२ जानेवारीला दुपारी २ ते ५ वाजता महिलांसाठी अतिशय उत्साहवर्धक तसेच संस्कृतीचे जतन म्हणून आनंदात भर टाकणारा ठरला आहे. यानिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी महिलांचे होणारे एकत्रीकरण तसेच भेटीगाठीचा क्षण नावीन्यपूर्ण राहिला आहे. जीवनसाथी पतीचे नाव घेत असताना महिलांची उडालेली भंबेरी तसेच लाजत-मुरडत करण्यात येणारे हास्य- विनोद प्रेरणादायी ठरले आहे. संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व
मकर संक्रांतनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांची ओटी भरून तसेच वाण व भेटवस्तू देण्यात आली. सामाजिक कार्यात ठसा उमटवून भरारी घेणाऱ्या महिलांचा ,१० वी व १२ वीत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, उपस्थित महिलांचे स्लो डान्स, गृप डान्स,प्रश्न मंजुषा, गित गायन, तर संक्रांत महोत्सव निमित्त संक्रांत क्वीन,अनिता हटवार, रनर अप रुपाली घावडे, इत्यादींना अतिथींच्या हस्ते , आले..कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉ.भाग्यश्री हटवार,पुष्पा साठवणे,कविता तेलरांधे,सुनीता बाळबुधे प्रमुख अतिथी लता कुंभालकर,प्रीती डोरले, अपर्णा आकरे, निलिमा टिपले,
यांची उपस्थिती होती. सायंकाळी ७ .३० वाजता संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम जिल्हा पुरवठा अधिकारी नरेन्द्र राजाराम वंजारी, विदर्भ तैलिक महासंघ केंद्रीय उपाध्यक्ष प्रा.सुभाष वाडीभस्मे , जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रशेखर गिरडे
यांचे उपस्थितीत मुख्य.कार्यक्रम संपन्न झाले.या दोन दिवसीय संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम यस्वीतेसाठी संताजी मंडळ चे अध्यक्ष आर.एस. दिपटे , उपाध्यक्ष डी.जी. आकरे,सचिव सुनिल किरपाने ,सहसचिव एस. बी.मेहर, टी. जे. बावनकर, कोषाध्यक्ष के.एम.खोब्रागडे, कैलाश बडवाईक, राधेश्याम भोंदे,,आर. डी.चकोले एस. डी.राजूरकर, अतूल उमाटे ,महिला मंडळ अर्पणा आकरे, कविता तेलरांधे. निलिमा टिपले,मोहिनी किरपाने, पल्लवी खंडाईत, प्रिती वंजारी, मेघा वंजारी, रोषणा हटवार, कविता मेहर, निशा समरीत, पायल किरपाने, शिल्पा उमाठे, विजया पडोळे, नंदा कावळे, रेश्मा कृपान, किरण साठवणे, मोनिका बडवाईक, कविता बोंदले, एन. यु. पंचभाई, पुष्पा दुधे, सिमा घाटे, सी. एन. मदनकर, कु. मनीषा पडोळे इत्यादी महिलांचे. अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आले. या दोन दोन दिवसीय कार्यक्रमांचे सुत्र संचालन कुमुद हत्वार व प्रिती वंजारी यांनी तर आभार रोशनी हटवार यांनी केले