क्राइम
जनावरे चोरून नेणाऱ्या आरोपींना अटक

मोर्शी / तालुका प्रतिनिधी
दिनांक १७/०१/२०२५ रोजी फिर्यादी नामे सुरेश आत्माराम श्रिराव वय ७५ वर्ष, रा. श्रिकृष्ण पेठ मोर्शी यांनी तक्रार दिली की, दिनांक १५/०१/२०२५ रोजी रात्री दरम्यान त्यांचे मालकीची तिन गायी कि.अं. ३५,०००/-रु ची शेतातील झोपडी मधुन अज्ञात इसमांनी चोरुन नेली अशा तक्रारीवरुन पो.स्टे. मोर्शी येथे अप.क्र. ३४/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.या प्रकरणात मुख्य आरोपी जुनेद खान दराब खान पठाण वय २२ वर्ष, रा. पाणी टाकी जवळ, मोशी याच्या सह आवेज खान नदिम खान वय २१ वर्ष, रा. शम्स कॉलीनी, मोर्शी , अक्षय संजय काळमेघ वय २१ वर्ष, रा. गांधी चौक, मोर्शी, तौसिफ अहेमद अब्दुल मुनाफ वय २४ वर्ष रा अंबाडा ता मोर्शी संतोष रामु परतेकी वय १९ वर्ष रा मलीनपुर ता मोर्शी यांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सा., (भा.पो.से.), अमरावती ग्रामीण यांनी जनावरे चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालुन टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने जनावरे चोरी संबंधाने दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना स्था.गु.शा., अम.ग्रा. येथील पो.उप.नि. सागर हटवार व त्यांचे पथक हे रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेणे कामी मोर्शी उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जुनेद खान याने त्याचे साथीदारासह जनावरांची चोरी केली आहे अशा माहितीवरुन लागलीच वरील आरोपीतांना ताब्यात घेवुन त्याना विश्वासात घेवुन जनावर चोरी सबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी मोर्शी व शिरखेड येथुन एकुण ३ गाई व ३ बैल चोरी केल्याची कबुली दिली वरुन त्यांचेकडुन पोलीस स्टेशन मोर्शी १) अप क्र ३४/२५ कलम ३०३ (२) भान्यासं २) पोस्टे मोर्शी अप क्र ७३/२५ कलम ३०३ (२) भान्यासं व पोस्टे शिरखेड अप क्र १३/२५ कलम ३०३ (२) भान्यासं प्रमाणे गुन्हे उघडकीस आणुन त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली बोलेरा पिकअप गाडी कि.अं. ५,००,०००/-रु आणि जनावरे चोरी करुन विक्री व नफापोटी कमविलेली नगदी रक्कम १,०५,०००/- रु असा एकुण ६,०५,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपीतांकडुन एकुण ३ गुन्हयांची उकल करण्यात आली असुन त्यांना पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. मोर्शी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई अमरावती ग्रामीण चे मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे), मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत (भापोसे), यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. किरण वानखडे यांचे नेतृत्वात पो.उप.नि. सागर हटवार, पोहवा रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, भुषण पेठे, पोका पंकज फाटे गुणवंत शिरसाठ, चेतन गुल्हाने, सागर धापड, रितेश गोस्वामी व चालक प्रज्वल राउत यांनी केली.