क्राइम

आमदाराच्या सुनेची आत्महत्या ; आमदार पुत्राला अटक

Spread the love

छिंदवाडा / नवप्रहार वृत्तसेवा

                       येथील काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांच्या सुनेने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सोहनलाल वाल्मिकी यांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. तर राहते घरही सील करण्यात आले आहे.आदित्य वाल्मिकी असं आमदाराच्या मुलाचं नाव असून त्याच्यावर 28 वर्षांच्या पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका यांना कित्येकदा आवाज देऊनही त्यांनी हाकेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र त्यावरही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा मोनिकाने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत घर सील केले आणि मोनिका यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. रिपोर्टनुसार, अडीच वर्षांपूर्वी मोनिका आणि आदित्य यांचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह झाला होता.

पोलिस अधिकारी जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य वाल्मिकी यांच्यावर पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आदित्य हा परासिया मतदारसंघातील काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांचा मुलगा आहे. 14 डिसेंबर रोजी मोनिका हिने गळफास घेत आत्महत्या केली होती.

मोनिका हिने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटदेखील लिहली होती. यात तिने आदित्यवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोनिकाच्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या तक्रारीवरुन आदित्यविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, मोनिकाच्या आईने आदित्यवर हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, मोनिका हिच्या बहिणीनेदेखील आरोपी आदित्यवर गंभीर आरोप केले होते. आदित्य माझ्या बहिणीला छळत होते. तसंच, त्यांचे बाहेर अफेअर होते, आसा आरोप तिने केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close