10 ते 13जानेवारी पर्यंत पोस्टल ग्राऊंड येथे जैन बिझनेस कार्निवलचे आयोजन
यवतमाळ / प्रतिनिधी
जोश फाऊंडेशन ही यवतमाळ शहरातील, सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य अशी सामाजीक संस्था आहे. यास संस्थेच्या वतीने दरवर्षी जैन बिझनेस कार्निवलचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी हे आयोजन 10ते 13जानेवारीला समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे केल्या जात आहे.10जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन सोहळा मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे
ऑनलाईन खरेदीच्या काळात परंपरागत व्यवसायाला नुकसान पोहोचत आहे. काहींचे व्यवसाय
डबघाईस येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशा व्यवसायांना एका उत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोरआणणे, व्यावसायीकांना आपल्या व्यवसायाचा प्रचार, प्रसार आणि प्रदर्शन करण्याची संधी देणे, त्याला ग्राहक उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यवसायास संजीवनी देणे, हा या जैन बिझनेस कार्निवलचा मुख्य हेतू आहे.या कार्निवलच्या माध्यमातून यवतमाळकरांना देखील विविध वस्तूंच्या प्रदर्शनीसह खरेदी करण्याची, विविध खाण्याच्या स्वादीष्ट पदार्थाची मेजवानी, मुलांना खेळण्यांचा आनंद घेण्याची. या जैन बिझनेस कार्निवल मध्ये मध्ये विविध गृहपयोगी वस्तू,सौंदर्य प्रसाधने, ऑटोमोबाईल क्षेत्रातील विविध गाडया, रूचकर खाण्याचे पदार्थ आणि खेळ या सर्वांची
यवतमाळकरांना एक प्रकारे मेजवानीच मिळणार आहे.
जैन बिझनेस कार्निवल 2025 हा जैन समाजातील युवक वर्गानी जरी आयोजित केलेला उपक्रम असला तरी तो सर्वच यवतमाळकरांसाठी व्यावसायीकदृष्टया, प्रदर्शन आणि खरेदीसाठी खुला आहे. तरी दि. 10 ते 13जानेवारी दरम्यान आयोजीत होणा-या या जैन बिझनेस कार्निवलचा समस्त यवतमाळकर यांनी लाभ घ्यावा असे आव्हान वैभव गुगलीया वंदना बोरुंदिया जिनेश कर्नाटक जयेश बोरा शुभम खीवसरा गौरव खीवसरा राजेश गुगलिया. उमेश बैद. अशोक कोठारी. खूशबु भंडारी. अर्पित बोरा, प्रजोत काकारिया. अर्पित बोरा. ईशान बोथरा. आरती खिवसरा, वर्षा तातेड , राणू झांबड, साक्षी दर्डा ,आनंद भंडारी, दीपेश बोरा. प्रणित सिगी..मीनल बोरा व आयोजकां वतीने करण्यात आले आहे.