सामाजिक

आर्वीत विवीध संघटनेच्या माध्यमातून जागतीक आरोग्य दिन साजरा

Spread the love

 

नियमित प्रणायमामुळे आरोग्याची सुरक्षा

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी :-सद्यस्थितीत नागरिकाची आरोग्याची परिस्थिति पाहिली असता सर्वांनी कमीत कमी 30 मिनिटे पायी चालणे, व्यायाम करणे व योग्य तो आहार घेतल्यास मधुमेह ,उच्च रक्तचाप,तसेच हृदयासंबंधीच्या आजारापासून आपला बचाव होऊ शकतो असे प्रतिपादन करुन जागतिक आरोग्य दिनानिमित्त या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला असे इंडियन रेडक्रॉस सोसायटी आर्वी शाखेचे संस्थापक सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अरुण पावडे यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्य शहरातील सर्व सामाजिक संघटना,आर्वीद्वारा शुक्रवार 7 एप्रिल 2023 पावडे नर्सिग होम येथून ‘WALKATHON’ Walk for Health, Health for All…. आयोजित समारोप कार्यक्रम प्रसंगी सांगितले
याप्रसंगी आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादारावजी केचे, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे लॉयन्स क्लबचे डॉ रिपल राणे,पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर व व इतर मान्यवर उपस्थित होते
चला चालुया….स्वतःच्या आरोग्याकरीता या ‘WALKATHON’ ची सुरवात पावडे नर्सिग होम येथून झाली पावडे नर्सिंग होम -बस स्टैंड – डॉ. धरमठोक डेन्टल क्लिनिक – – डॉ राणे क्लिनिक -डॉ बुधवाणी हॉस्पिटल – न्यायालय – डॉ. ठोंबरे डेन्टल क्लिनिक – • गांधी चौक ,या मार्गाने पावडे नर्सिंग होम येथे पोहचल्यावर समारोप करण्यात आला
स्वस्थ व बलशाही भारत घडविण्याकरता अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडविण्याचे कार्य होते असे आमदार दादारावजी केचे यांनी सांगितले
कार्यक्रमाचे संचालन डॉ अभिलाष धरमठोक यांनी तर आभार डॉ विनय देशपांडे यांनी मानले
या उपक्रमात इंडियन रेडक्रॉस सोसायटी, लॉयन्स क्लब ,रोटरी क्लब, मदत फाऊंडेशन ,लॉयन्स क्लब आर्वी सेवा, मातृसेवा संघ, भारत सेवक महिला मंडळ , गौरव जाजू मित्र परिवार , माहेश्वरी महिला मंडळ , जिव्हाळा फाऊंडेशन , इनरव्हील क्लब, डॉक्टर्स असोशिएशन, आर्वी तालुका पत्रकार संघटना , निरंकारी मिशन , सखी मंच ,व्यापारी संघटना ,वकील संघटना , आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप ,अग्रवाल नवयुवक मंडळ ,गीता परिवार, यांचे पदाधिकारी ,सदस्य,नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते
महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता आरोग्य विषयक काळजी घेणारे संदेश देणारे पोस्टर्स व बैनर सामाजिक संघटनेचे सदस्य रॅलीमध्ये घेऊन सहभागी झाले होते
रॅली यशस्वी करण्याकरता सर्व संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close