शॉट सर्किट मुळे घराला लागली आग लाखो रूपयांचे नुकसान
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील सावंगी (संगम) येथील बाबूलाल रावजी आत्राम व अशोक बाबूलाल आत्राम या दोन घराला आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य, कापूस, सोयाबीन ,अन्नधान्य सह शेती उपयोगी साहित्य ,रासायनिक खत,टीव्ही,मोबाईल,कपडे, लाकडी पलंग,सोने दागदागिने, तसेच रोख रक्कम,जळून खाक झाले आहेत. दि.१४.११.२३ ला दुपारच्या 2 वाजताच्या सुमारास अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र सुदैवाने घरात कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.मात्र या आगीच्या घटनेत घरातील सर्वच वस्तू जळून अक्षरशः खाक झाल्या आहेत.आत्राम कुटुंब आता रस्त्यावर आले आहे.आगीच्या घटनेत संसारचं होत्याचं नव्हतं झाल्याने आता पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार आहे. गावातील प्रतिष्ठित सर्व लोकांनी लोकसहभाग करून, देणगी गोळा करुन कुटुंबाला मदत करीत असून या घटनेनंतर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांना प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्ता कडून केली जात आहे.