हटके

अजबच हं … अंतिम संस्कारासाठी तरुण अचानक उठुन बसतो तेव्हा 

Spread the love

झुणझुनू (राजस्थान ) / नवप्रहार डेस्क

            कधी कधी अश्या घटना घडतात की त्यावर विश्वास करावा अथवा नाही असा प्रश्न मनाला पडतो. पण वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर त्यावर विश्वास करणे ही मजबुरी होऊन बसते. अशीच घटना राजस्थान च्या झुनझुनू येथे घडली आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेला २५ वर्षांचा तरुण अंत्‍यसंस्काराच्या काही क्षणा पूर्वी तो  शुद्धीत आला.यामुळे स्मशानभूमीत एकच गोंधळ झाला.या घटनेनंतर तीन डॉक्टरांना निलंबित केले आहे.

रोहिताशकुमार नावाचा मूक-बधीर तरुण एका अनाथाश्रम राहत होता. तेथे गुरुवारी (ता.२१) रोहिताशची तब्येत खालावल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला झुनझुनूच्या बीडीकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी रोहिताशचा मृत्यू झाल्याचे रात्री दोन वाजता जाहीर केले. त्याचा मृतदेह दोन तास शवागारात ठेवला होता. पोलिसांनी पंचनामा करून अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पाठवून दिला. मात्र मृतदेह चितेवर ठेवताच रोहिशातकुमारने अचानक श्वास घेण्यास सुरुवात केली, असे पोलिसांनी सांगितले.

वाटेतच मृत्यू

त्यानंतर ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून रोहिताशला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जयपूरच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्याची शिफारस करण्यात आली. तेथे नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशीसाठी समिती

रोहिताशच्या तपासणीतील कथित वैद्यकीय निष्काळजीपणाची दखल घेत झुनझुनुचे जिल्हाधिकारी रामावतार मीना यांनी डॉ. योगेश जाखड, डॉ.नवनीत मील आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पाचर यांना गुरुवारी (ता.२१) रात्री निलंबित केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून वैद्यकीय विभागाच्या सचिवांना याची माहिती देण्यात आली आहे, असे मीना यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close