मतदाराना सोयीस्कर म्हनजे त्याच विभागातील बूथवर त्यांचे नावे ठेवावीत
जिल्हाधिकारी यांना भाजपा कडून निवेदन
अकोला
मतदार राजाला त्रास होता कामा नये व गैरसोय होऊन लोकशाही मधील घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचा व लोकशाहीतील महत्त्वाचा राजा मतदार राजाला मतदानात केंद्रावर दूर जाता कामा नये त्याला धावणारी अडचण होऊ नये यासाठी मतदार याद्या तयार करताना त्याच भागातील या मतदार मतदान केंद्र जवळ टाका लोकसभेसारखा गैरसोयी करू नका अन्यथा जनतेचा उद्रेक होईल व लोकशाहीतील सर्वात मोठा पर्व पासून वंचित राहता कामा नये अशी निवेदन जिल्हाधिकारी यांना जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देऊन अकोला पूर्व अकोला पश्चिम, बाळापुर मुर्तीजापुर, अकोट विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या समस्या विशेषतः शहरी भागातील अडचण संदर्भात सविस्तर निवेदन खासदार अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वात आमदार रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, तेजराव थोरात वैशाली निकम संतोष शिवरकर, श्रीकृष्ण मोरखडे मनीराम टाले यांच्या नेतृत्वात
मा. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना निवेदन किशोर पाटील यांनी पाचवी विधानसभा मतदारसंघातील समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष सांगून मतदान ची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग प्रयत्न करीत असताना आपण अशा चुका करता कामा नये यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे असे सांगून लोकसभेत झालेल्या चुका अडचणी यासंदर्भात निवेदन दिले व भेदभाव न करता जातीवाद न करता सगळ्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल याकडे लक्ष देण्याची निवेदन त्यांनी दिले यावेळी माधव मानकर गणेश तायडे गणेश लोड विपुल घोगरे, शिवशर्मा पंकज पळसपगार, दादासाहेब कुचके डॉक्टर किशोर कुचके अर्चनाताई मसने, गीतांजली ताई शेगोकार हरीश काळे डॉक्टर अमित कावरे प्रशांत अवचार, अभिमन्यू नळकांडे, देवेंद्र देवर विवेक भरणे राजेश नागमते, पंकज वाडी वाले, एडवोकेट देवाशिष काकड सागर शेगोकार अंबादास उमाळे विठ्ठल चतुरकर रवी गावंडे उदय थोरात संदीप गावंडे शाम विंचनकर गणेश अंधारे तुषार भिरड, गोपाल मुळे श्रावण इंगळे प्रवीण जगताप मिलिंद राऊत आधी निवेदन देताना उपस्थित होते
मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदान केंद्राच्या Rationalization वर आक्षेप नोंदविणेबाबत यांचे पत्र क्र. 23/2024 ERS (Vol.II) Dated 20.06.2024 च्या पत्रान्वये
,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने च्या आधारित मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदान केंद्राच्या Rationalization बाबत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर अनेक मतदान केंद्रांमध्ये मतदार यादीचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. यासंदर्भात प्रशासन लक्ष देण्याची मागणी भाजपातर्फे करण्यात आली
याच अनुषंगाने 031 अकोला पूर्व विधानसभा मतदार व अकोला पश्चिम, बाळापुर मुर्तीजापुर अकोट मतदार संघ मध्ये लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीच्या वेळी जे मतदान केंद्र होते आणि ज्या मतदान केंद्रामध्ये मतदारांची संख्या ही 1500 पर्यंत मर्यादित होती ती मतदारांची संख्या कमी करुन 1300 ते 1400 करण्याच्या दृष्टीने सध्या कार्यवाही सुरू आहे. त्यामध्येच पक्षाकडून जी मागणी करण्यात आली होती ती अशी होती की, ‘जे मतदान केंद्र 1500 मतदार संख्या असलेले केंद्र आहे ते मतदारांची संख्या 1000-1200 करण्यात येऊन त्याच ठिकाणी Location change न करता त्याच ठिकाणी ‘अ’ आणि ‘ब’ त्याच इमारतीमध्ये करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु आमच्या असे लक्षात आले की, मतदारांची संख्या कमी करतेवेळी ज्या मतदान केंद्रात मतदारांची संख्या 800-900 असेल व दुसऱया मतदान केंद्रात तीच मतदारांची संख्या ही 1400-1500 पर्यंत असेल त्या ठिकाणचे 200 मतदारांची संख्या कमी करुन ही ज्या मतदान केंद्रावर 800-900 मतदार आहेत त्या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे मतदारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार होता कामा नये अशी मागणी किशोर पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली व. परिणामी एकाच वसाहतीतील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात गेल्याने मतदानाच्या दिवशी मतदाराला आपले मतदान केंद्र शोधण्यास अडचण निर्माण होईल, व जनतेचा उद्रेक होईल त्यामुळे मतदार यादीतील काही भाग तोडून नवीन मतदान केंद्र तयार करणे म्हणजे मतदाराला संभ्रमात टाकणे होईल, त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर सुध्दा होऊ शकतो, अशी आमची धारणा आहे. परिणामी जे मतदान केंद्र 1500 मतदारसंख्येपर्यंत सीमित आहे ते
प्रे कार्यालय 200 पर्यंत कमी करुन त्याच इमारतीमध्ये ‘अ’ आणि ‘ब’ असे वर्गीकरण करुन कोणत्याही प्रकारे
Rationalization या नावाखाली मतदारावर याचा परिणाम होणार नाही याची खात्री मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून आम्हाला मिळावयास हवी.
विधानसभा निवडणुकीला फक्त दोन ते तीन महिने शिल्लक असतांना अशाप्रकारे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्राच्या Rationalization च्या नावाखाली मतदार यादीचा भाग तोडणे, मतदारांना निवडणुकीच्या वेळी गैरसोय निर्माण होईल अशी व्यवस्था निवडणूक आयोग करत आहे की काय, अशी शंका निर्माण होणे या सर्व बाबी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. असल्याचीही निवेदनात म्हटले आहे.
, Polling stations having more than 1500 electors shall be Rationalize as per given the schedule before the draft publication of electors role in accordance with instructions content in manual on polling station 2020 या अनुषंगाने मतदान केंद्राची संख्या विधानसभानिहाय वाढविणे अथवा Auxiliary करण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन मतदान केंद्राचे Rationalize करतेवेळी कोणत्याही प्रकारे अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची याची तोडून ती दुसऱया मतदान केंद्रावर टाकण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्याच ठिकाणी ‘अ’ आणि ‘ब’ अशा वर्गवारीमध्ये मतदान केंद्र त्याच इमारतीमध्ये मंजूर करावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदाराची मतदान करतेवेळी गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती. भाजपा शिष्टमंडळाने जिल्हा निवडणूक आयोग अधिकारी यांना केली आहे