*प्रदीपभाऊ वानखडे यांना मातृशोक
बाळासाहेब नेरकर कडुन
मूंडगाव ता अकोट जी अकोला
भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रदीपभाऊ वानखडे यांच्या मातोश्री माजी मुख्याध्यापिका श्रीमती कुसुमबाई सदाशिवराव वानखडे यांना 25/7/2024 ला रात्री देवाज्ञा झाली. त्या 84 वर्षाच्या होत्या . त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे आहेत. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
मुंडगाव येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे माजी राज्यमंत्री रणजीत पाटील, माजी आमदार संजयभाऊ गावंडे ,माजी आमदार हरिदासजी भदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई आढाऊ उपाध्यक्ष सुनील फाटकर, धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद देंडवे यांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी राजकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तथा जिल्हाभरातील अनेक नेतेमंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.