क्राइम

इरफान अल्पवयीन हिंदू मुलीचा पाठलाग करून तिच्यावर टाकत होता लग्नासाठी दबाब

Spread the love

शिर्डी / विशेष प्रतिनिधी

शेजारी असल्याचा फायदा घेत एका मुस्लिम तरुणाकडून अल्पवयीन हिंदू तरुणींवर लग्नासाठी दबाब आणत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कामात इरफान चा भाऊ आणि त्याची वहिनी त्याला मदत करीत असल्याचे देखील समोर आले आहे. बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी ही प्रकरण चव्हाट्यावर आणले आहे.

या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इरफान सलीम शेख या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ओळखीचा गैरफायदा

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी राहता तालुक्यात आपल्या आई-वडील आणि दोन भावांसह भाड्याच्या खोलीत राहते. सुमारे 8 महिन्यांपूर्वी त्यांच्या शेजारीच एक कुटुंब राहण्यासाठी आले होते.

शेजारी असल्याने झालेल्या ओळखीचा फायदा घेत इरफान शेख याने या मुलीचा छळ सुरू केला. तो केवळ तिचा पाठलागच करत नव्हता, तर तिला सतत मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.

शाळेत जाताना अडवणूक आणि

आरोपी इरफानचे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही. पीडित मुलगी जेव्हा शाळेत जात असे, तेव्हा तो तिचा रस्ता अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. शाळेबाहेर होणाऱ्या या त्रासासोबतच त्याने सोशल मीडियाचाही आधार घेतला.

इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो पीडितेशी सतत संपर्क साधून तिला लग्नासाठी धमकावत होता आणि दबाव टाकत होता. या सततच्या त्रासामुळे ही 15 वर्षांची मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत होती.

धर्मांतरासाठी दबाव

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे इरफानला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही साथ दिली. इरफानचा भाऊ अरबाज आणि भावजय आयशा यांनी त्याला या कृत्यात मदत केल्याचे समोर आले आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आयशा हिने तिला स्वतःच्या धर्माची माहिती देऊन नमाज पठण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, असे आमिष दाखवले. इतकेच नाही तर बीफ खाल्ल्याने गोरेपणा येतो, असे विधान करून तिला एका ठराविक विचारसरणीकडे ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

लव्ह जिहादचा आरोप

राहता तालुक्यातील बजरंग दलाने हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. ही घटना म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला धीर दिला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिर्डी परिसरात एकामागून एक घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला आहे का, असा सवाल विचारला जात आहे.

शिर्डी पोलिसांनी मुख्य आरोपी इरफान शेख याला तत्काळ अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्यात त्याला मदत करणारे अरबाज आणि आयशा हे दोघे सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पालकांनी लक्ष ठेवणे आता अनिवार्य झाले असून पोलिसांनी अशा प्रकरणांत कठोर धोरण राबवावे, अशी मागणी होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close