तो व्हेलं च्या पोटात होता ३०ते ४० सेकंद
अमेरिका / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क
संकट कधी आणि कुठे येईल याचा काही नेम नसतो. पण अश्या कठीण परिस्थितीत ही डोकं शांत ठेवलं तर कुठल्याही संकटातून बाहेर पडता येते. याचा प्रत्यय अमेरिकेच्या एका स्काय डायव्हर ला आला आहे. स्काय डायव्हिंग करताना त्याला व्हेलं ने गिळले होते. तों व्हेलं च्या पोटात ३० ते ४० सेकंद होता. पण डोकं शांत ठेवून तों या संकटातून बाहेर पडला. मायकल पॅकर्ड असं या व्यक्तीचं नाव असून त्याची कहाणी वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.
झालं असं होतं की, मायकलला समुद्रात एका व्हेल माशाने गिळलं होतं. पण व्हेलने त्याला मारण्याआधी तो व्हेलच्या पोटातून बाहेर आला. या खतरनाक घटनेची कहाणी डेली स्टारने प्रकाशित केली आहे. ज्यात मायकलने तो कसा व्हेलच्या पोटातून बाहेर आला याबाबत सांगितलं आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या प्रोविंसटाउन समुद्र किनाऱ्यावर मायकल स्काय डायव्हिंग करत होता. सगळं काही ठीक सुरू होतं. पण अचानक असं काही झालं जे मायकल कधीही विसरू शकणार नाही. एकाएकी त्याच्या डोळ्यांसमोर अंधार झाला. त्याला याची जाणीव झाली होती की, त्याला व्हेलने गिळलं आहे. त्या क्षणाबाबत सांगताना तो म्हणाला की, “असं वाटलं जणू माझं विश्व अचानक पूर्णपणे काळोखमय झालं आहे. ही घटना २०२१ मध्ये घडली होती. मला असं वाटलं होतं की, एखाद्या कारने मला जोरदार धडक दिली आहे”.
त्याने पुढे सांगितलं की, “मी पाण्यात दोन डाईव्ह केल्या आणि तिसऱ्या डाईव्हला जसा मी खाली जात होतो, अचानक मला एक धडक बसली आणि मग सगळीकडे अंधार दिसत होता”.
मायकल म्हणाला की, पाणी माझ्या चारही बाजूने वेगाने फिरत होतं, सगळीकडे अंधार होता. मला शरीरावर दबाव जाणवत होता. माझ्या डोक्यात केवळ हेच चालू होतं की, आता माझा मृत्यू जवळ आला आहे.
मायकलला याला अंदाज आला होता की, तो एका व्हेलच्या पोटात आहे. तो यावेळी केवळ मृत्यू, पत्नी आणि मुलांबाबत विचार करत होता.
अशात जीव वाचवण्यासाठी मायकलने व्हेलला आतून लाथा मारणं सुरू केलं. अचानक व्हेलने आपलं तोंड जोरात हलवलं आणि मायकल काही सेकंदात पुन्हा पाण्यात आला. जवळच असलेल्या क्रू मेंबर जोसिया मायोने पाहिलं की, व्हेलने मायकलला पाण्यात फेकलं. यादरम्यान मायकल साधारण ३० ते ४० सेकंद व्हेलच्या पोटात होता.