इंटीमेट होताना कपल खोली चा पडदा लावणे विसरले आणि .

लोकांनी रस्त्यावर उभे राहून बनवला या घटनेचा व्हिडिओ
जयपूर / नवप्रहार ब्युरो
आपल्या देशात पती – पत्नी का असेना त्यांना खाजगी बाबी करायच्या असतील तर त्यांना त्या त्यांच्या खोलीत जाऊनच करण्याची परवानगी आहे. पण कधीकधी काही कारणास्तव पती पत्नी खोलीचे दार लावणे विसरतात.किंवा खिडकीचे पडदे लावणे विसरतात. कारण यावेळी त्यांना ओढ असते तीच ‘ दो जिस्म एक जान ‘ होण्याची आणि हीच चूक त्यांना भारी पडते. जयपूर च्या नामांकित हॉटेल मध्ये आलेल्या एका कपल सोबत देखील असाच प्रकार घडला आहे. ते इंटीमेट होताना खिडकीचा पडदा लावणे विसरले. आतील रूम चे दिवे सुरू असल्याने बाहेरून त्यांची कामक्रीडा लोकांना दिसू लागली. काही लोकांनी या घटनेचा रस्त्यावर उभे राहून व्हिडिओ बनविल्याची आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा आहे. तर हॉटेल प्रबंधन ने हा व्हिडिओ त्यांच्या हॉटेल चू नसल्याचे म्हटले आहे.
ही खळबळजनक घटना मंगळवारी 17 जूनला रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. रस्त्यावर असलेले लोक आणि भारत जोडो सेतू पुलावर असलेल्या प्रवाशांनी या कपलचा व्हिडीओ कॅमेरात कैद केला आणि काही जणांनी इंटरनेटवर व्हायरल केला.
कपलचा हॉटेल रुममध्ये असलेला इंटीमेट सीन पाहण्यासाठी रस्त्यावर असलेल्या प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. दरम्यान, हॉटेलच्या स्टाफने या व्हिडीओ फेक असल्याचा दावा केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करत कपलच्या प्रायव्हसीबाबत मतं व्यक्त केलं आहे. कोणीही एखाद्या व्यक्तीचा खासगी व्हिडीओ शूट करणे, हे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे, असंही काही नेटकरी म्हणाले आहेत.
लोकं या व्हिडीओची खिल्ली उडवत म्हणाले, हे तर एक ओपन सिनेमाघर..या व्हिडीओमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमकर्मींनी हॉटेल मॅनेजमेंटसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी अशाचप्रकारची माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की, व्हिडीओत दिसणारा हॉटेल रुम त्यांचा नाहीय.
हॉटेलच्या रुममध्ये गेल्यावर सर्वात आधी पडदे आणि खिडक्या बंद कराव्यात. बाल्कनीत जाऊन याची खात्रीही करावी.रुममध्ये हिडन कॅमेरा असण्याची शक्यता असते. त्यामुळे रुममध्ये गेल्यावर प्रत्येक कोपरा, बाथरूम, एसी, टीव्ही आणि भिंतीवर एखादा कॅमेरा लावला आहे की नाही हे तपासावं. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. चेक आऊट केल्यानंतर तुम्ही जेव्हा रुमच्या बाहेर पडता, तेव्हा एकदा खात्री करा की, बाथरूम आणि रुमच्या खिडक्या व्यवस्थितपणे बंद होत्या की नाही..
पोलिसांनी तो व्हिडिओ डिलिट करण्याचे दिले आदेश – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार जेव्हा पोलिसाना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी सोशल मीडियावर या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नेटकऱ्यांना संबंधित व्हिडिओ त्यांच्या कडून डिलिट करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.