युवासेनेच्या मोर्च्यांची दखल ; अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
रखडलेले कामे वेळीच पूर्ण करणार
दर्यापूर प्रतिनिधी– मागील वर्षी केंद्र शासनाने बांधलेल्या दर्यापूर ते अकोट रोडचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. पण रोडच्या बांधकामाच्या एका बाजूने पूर्ण नालीचे बांधकाम करण्यात आले पण त्याच्या दुसऱ्या बाजूला बस स्थानकापासून ते शेतकरी सदन पर्यंत उजव्या बाजूला नालीचे बांधकाम पूर्णपणे अपूर्ण आहे. त्यामुळे तेथे नाली पूर्णपणे सांड पाण्याने भरली असून साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येत आहे व ती बांधकाम न केल्यामुळे उपसल्या जात नाही व गांधीनगर लगत त्या नालीचे पाणी लोकांच्या घरात जात असून रोगराईचे प्रमाण वाढत आहे, सरपटणारे प्राण्यांची निर्मिती होत आहे, याच कामाची दखल घेऊन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय दर्यापूर येथे धडक मोर्चा नेला व कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले.
कार्यकारी अभियंता दर्यापूर यांनी युवासेना च्या निवेदनाची वेळीच दखल घेऊन ठेकेदार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि युवासेना चे शिष्टमंडळ लगेच साईटवर पोहोचले प्रत्यक्ष पाहणी करून येणाऱ्या आठ दिवसात काम पूर्ण करतो असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी दिले.
युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, निलेश पारडे, मनोज लोखंडे, सागर वडतकर, सतीश जामनिक, नितीन माहुरे, स्वप्निल विल्हेकर,गणेश पारवे, विशाल बागडे, मनोज लाड,पिंटू कात्रे, गणेश डाहाळे तसेच युवसैनिक उपस्थित होते..
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती..