हटके

आंतरधर्मीय दाम्पत्यावर टोळक्याचा हल्ला 

Spread the love

हैदराबाद / नवप्रहार मीडिया 

                     एका आंतरधर्मीय दाम्पत्यावर टोळक्याकडून हल्ला करम्यात आल्याची घटना शहरात घडली आहे.इतकेच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनवत तो समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या दखल घेत चारमिनार पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

 या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एक बुरखा परिधान केलेली महिला तिच्या लहान बाळाबरोबर दिसतेय. तसेच तिच्याबरोबर असणारी व्यक्ती (तिचा पती) हिंदू असल्यामुळे या आरोपींनी जोडप्यावर हल्ला केल्याचं व्हिडीओतून समोर आलं आहे.

ही घटना सोमवारी (२५ मार्च) रोजी घडली आहे. परंतु, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं. या पथकाने चार जणांना अटक केली असून त्यांचे फोनदेखील जप्त करण्यात आले आहेत. हल्ला होत असताना त्यांच्यापैकीच एकाने त्याचं चित्रण केलं होतं.

चारमीनारचे सहाय्यक पोलीस आयुक्त पी. चंद्रशेखर म्हणाले, चार जणांनी एका जोडप्याबरोबर दुर्व्यवहार केला होता. त्यावेळी महिलेबरोबर तिचं बाळही होती. या आरोपींमुळे महिलेच्या बाळालाही दुखापत झाली आहे. आमच्या विशेष पथकाने या आरोपींना ताब्यात घेतलं असून सोमवारी न्यायालयासमोर उभं केलं जाईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close