राजकिय

‘ वर्षा ‘  वर खलबत : मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क

              अजित दादा समर्थक राष्ट्रवादीचा गट सरकार मध्ये शामिल झाल्यानंतर खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार या विषयावर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित दादा यांच्यात काल रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्य म्हणजे परवा रात्री सुद्धा या तीन नेत्यांत बैठक झाली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली असली तरी अध्याप खाते वाटप झालेले नाही.तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारा बाबात अनेक वेळा शिंदे आणि फडणवीस यांनी भाष्य केले आहे. पण विस्ताराचा मुहूर्त मात्र निघाला नाही.

विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील कालच्या बैठकीनंतर आज राष्ट्रवादीच्या आठ नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयातील कोणतं दालन कुणाला द्यावं, याबाबत राज्य सरकारकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं मिळत आहेत. त्यासाठीच या तीनही बड्या नेत्यांची बैठक पार पडत असल्याची मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी तर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला सांगून टाकला आहे. भरत गोगावले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना भाजप आणि शिवसेनेत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. तसेच याच फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सात नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होण्याआधीच खात्रीलायक सूत्रांनी या विस्तारातील तीन मंत्र्यांची नावे सांगितली आहे. यामध्ये भारत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांचं नाव समोर आलं आहे. तसेच चौथ्या नावासाठी संजय शिरसाट आणि योगेश रायमूलकर यांच्यामध्ये चुरस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कुणाची मंत्रिपदी वर्णी लागते ते लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याशिवाय या विस्तारात राष्ट्रवादीला स्थान नसणारची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

दरम्यान, ही बैठक सुरु असताना शिंदे गटाचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी ‘वर्षा’ बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री विस्ताराबद्दल लवकरच निर्णय घेतील. मी आतमध्ये होतो. माझ्या विभागाचे काही काम होतं, त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. सध्या चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र राज्याच्या विकास होत आहे म्हणून अजित पवार सोबत आलेले आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close