सामाजिक

साहित्य संमेलने ही समाजाची खरी दिशादर्शक आहेत ! – पुषपराज गावंडे

Spread the love

मुर्तिजापूर – तरूणाई फाऊंडेशन तथा संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध युवा कादंबरीकार व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्री पुष्पराज गावंडे हे बोलत होते. ते म्हणाले की मराठी साहित्य संमेलने ही समाजाची खरी दिशादर्शक आहेत पण सामान्य माणसाला वाटते की यातून आपल्याला काही पुण्यलाभ होत नाही वा अर्थलाभ होत नाही मग अशा संमेलनात कशाला जायचे ? या गैरसमजामुळे सामान्य माणूस साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवतो, हजेरी लावत नाही. परिणामी तो ख-या व पारदर्शी विचार मुल्या पासून वंचित राहतो.

केंद्र शासनाचा निती आयोग संलग्न कुटास्याच्या तरुणाई फाऊंडेशनच्या व संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील राधा मंगलम सभागृहात आयोजित चौथ्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, संमेलनाध्यक्ष डॉ. स्वाती पोटे यांनी ही समाजाच्या विचारांच्या मंथनासाठी साहित्य संमेलनाची गरज बोलून दाखविली पूर्वसंमेलनाध्यक्ष तुळशीराम बोबडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.चिंतामण कांबळे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, ग्रामगीताचार्य डॉ.रामकृष्ण गावंडे, प्रा.राजकन्या खनखने, शंकर जोगी, संदीप वाकोडे, रविंद्र जवादे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमापुजनाने कार्यक्रम सुरू झाला. स्वागताध्यक्ष अनिल डाहेलकर यांनी स्वागतपर भाषणातून भूमिका निवेदन केली.
उद्घाटनपर भाषणातून पुष्पराज गावंडे यांनी म.रा.साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून साहित्यिक संस्थांच्या पाठीशी सक्षपणे उभे रहाण्याची ग्वाही दिली. प्रा.डॉ.चिंतामण कांबळे, ग्रामगीताचार्य रामकृष्ण गावंडे, तुळशीराम बोबडे, प्रा.अविनाश बेलाडकर यांची भाषणे झाली.

संत गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठान व तरुणाई फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, समाजभूषण व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने जळगाव (खा) चे प्रा.दीपक पवार आदर्श शिक्षक, सतीश पाटील, नागपूरच्या जया राठोड व प्रा.राजेश राठोड, जालन्याचे अंकुश पवार, अकोटचे देवानंद गावंडे, पाटसूलचे डॉ.शिवदास गाडेकर अध्यात्मिक सेवेसाठी किर्तनसेवा, अजय वानखडे किर्तनसेवा प्रबोधनकार, अकोटच्या मंगलाताई पुंडकर आदर्श समाजरत्न, अकोल्याच्या वैष्णवी गोतमारे स्वामी विवेकानंद युवाश्री, प्रा.गोवर्धन इंगोले, समाधान इंगळे समाजकार्यासाठी आदर्श समाजरत्न, मनोहर घुगे समाजकार्यासाठी आदर्श समाजरत्न, पुंडलिक गोसावी आदर्श समाजरत्न यांना सन्मानित करण्यत आले.

संमेलनासाठी तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदिप देशमुख , आयोजन समिती चे मिलिंद इंगळे , शैलैश गुप्ता, बाळुकाका गवई , गजानन खंडरे कार्य करित होते .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close