हटके

अंगावर काटा आणणारी घटना … अन अचानक त्यांच्या गाडी समोर आला सिंह 

Spread the love

         शहरात रात्री च्या वेळी सगळे कामे आटोपून मस्तपैकी लॉंग ड्राइव्ह ला जाणे, रस्त्यावर आरामात फिरणे हा छंद अनेकांना असतो . ज्याच्या कडे कार आहेत ते कार ने तर काही बाईक ने फिरायला जातात. पण अश्यावेळी तुमच्या बाईक च्या समोर सिंह आला तर तुमची अवस्था काय होईल ? याचा विचार न केलेलाच बरा. पण प्रत्यक्षात तसे घडले आहे. आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

 आउटिंगला गेलेल्या काही मित्रांच्या गाडी समोर अचानक एक सिंह येतो. तुम्ही कधी विचार केलाय का की अचानक तुमच्या गाडीसमोर वाघ, सिंह किंवा कोणताही जंगलाी प्राणी आला तर? अशी प्रत्यक्षात घटना घडली असून बाहेर रात्री फिरण्यासाठी गेलेल्या कपलच्या गाडीसमोर सिंह आला. हे दृश्य पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यानंतर पुढे काय घडतं ते सर्व कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ आहे आणि सर्वत्र काळाकुठ्ठ अंधार पसरलेला आहे. दुचाकीस्वार केवळ त्याच्या बाइकच्या हेडलाइट्सच्या प्रकाशामध्ये पुढे जात आहे. अचानक अंधारातून त्यांच्याकडे चालत एक सिंह येत होता. हे पाहून त्यांना तर घामच फुटतो. ते गाडी थांबवून त्याच्याकडे गाडीचा लाईट दाखवतात जेणेकरुन तो तेथून जाईल. तो हळूहळू त्यांच्या गाडीकडे चालत येतो तशी आधी मागच्या मागे तरुणी पळून जाते तर नंतर तरुण गाडीवरुन उतरुन पळून जातो. त्यानंतर सिंहही त्यांच्या मागे पळत जातो. हे काही सेकंद श्वास रोखणारे आहेत.

wildtrails.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.या व्हिडिओसह युजरने दावा केला आहे की, तो गुजरातमधील गीरचा आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे – तो माणूस बाईक सोडून पळून गेला कारण त्याला माहित होते की, जर त्याने गाडी हलवण्यात आपला वेळ वाया घालवला तर शिकारी सिंह त्याच्यापर्यंत पोहोचेल. अशाप्रकारे अनेकांनी या कपलचा निर्णय योग्य असल्याचं म्हंटलंय, तुम्हीही आम्हाला कमेंट करुन सांगा या कपलचा पळून जाण्याचा निर्णय योग्य होता का ?

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close