राजकिय

मुख्यमंत्री कोण ? छगन भुजबळ यांचे सूचक विधान     

Spread the love
                                        
  मुंबई  / विशेष प्रतिनिधी                                                महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशा नंतर आता  राज्याचा मुखमंत्री कोण ? याला घेऊन जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भाजपा ला मिळालेले यश हे मोदी लाटेपेक्षाही जबरदस्त आहे. लोकसभेत एनडीए ची झालेली दुर्दशा पाहता विधानसभा निवडणुकीत काय होईल याची एनडीए ला मुख्यतः भाजपा ला चिंता होती. पण राजकारणात मागील गोष्टी विसरून समोरचा विचार करावा लागतो. महायुती ने देखील तेच केले. मागील अपयश विसरून शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा विजयाचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागली. आणि निकाल जनतेच्या समोर आहे. अर्थानं                                 लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरून भारतीय जनता पक्षाने चक्रव्यूह भेदण्याची व्यूहरचना आखली. याकामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला तोलामोलाची मदत केली. त्याचमुळे तीन दशकानंतर मतदानाचा टक्का वाढला, हे अधोरेखित करावे लागेल.

नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व लाटेत देखील भाजपला १२५ जागांचा टप्पा ओलांडता आलेला नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे सूक्ष्म नियोजन आणि अचूक रणनीतीपुढे महाविकास आघाडी अक्षरश: धारातीर्थी पडली. लाडक्या बहिणींच्या आभाळ मायेच्या जोरावर महायुतीने २३५ जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नव्या सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने धक्कातंत्र वापरून नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकून नितीश कुमार यांच्याच हातात पुन्हा सत्तेच्या चाव्या दिल्या. अगदी शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवून भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षनेतृत्वाने जोरदार धक्का दिला. भाजप असेच धक्कातंत्र पुन्हा देणार असल्याची चर्चा शिवसेना नेत्यांच्या वक्तव्यांवरून सुरू झाली आहे. निवडणूक निकालात भाजप जरी सर्वांत मोठा पक्ष ठरलेला असला तरी मुख्यमंत्रिपदाचे कुठलेही निकष ठरलेले नाही, असे सांगून मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे बॉम्ब फोडला. परंतु महायुतीमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र मुख्यमंत्रिपदासंदर्भात दाटून आलेले मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांनी अजित पवार यांची पक्षाचे गटनेते म्हणून सर्वानुमते निवड केली. आता महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल असे भुजबळ यांना विचारले असता, भाजपने १३३ जागा जिंकल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कुणाचा विरोध असेल, असे वाटत नाही, असे सांगून फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर होणार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काम पाहता त्यांनाच पुढची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदी संधी द्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार करीत आहेत. तसेच आमचे मुख्यमंत्रिपदासंदर्भात काही ठरलेले नाही, असे सांगून मुख्यमंत्रिपदावर चर्चा आणि वाटाघाटी होऊ शकतात, असे अप्रत्यक्षपणे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे फडणवीस यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदावर दावेदारी असल्याचे प्रतित झाले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close