महाराष्ट्र योगशिक्षक संघ आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
नागपूर सतीश भालेराव – योगा फाऊंडेशन संचालित, महाराष्ट्र योग शिक्षक संघ आयोजित महायोगोत्सव २०२३ नागपूर अंतर्गत म.यो.शि. संघाचे नागपूर कार्यालय व भव्य राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने म.यो.शि.संघाचे संथापक अध्यक्ष डाॅ.मनोज निलपवार यांचे हस्ते रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमान नगर नागपूर. येथे सकाळी ११:०० वाजता करण्यात आले.
राज्यस्तरीय ऑनलाइन उपांत्य फेरी योगासन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ४२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. महिला व पुरुष गटाची चार-चार अशी विभागणी केलेली असून वयोगटानुसार आठ गट पाडण्यात आले. १७ सप्टेंबर २०२३ ला सर्व स्पर्धकांची ऑनलाइन स्पर्धा पारंपारिक योगासन प्रकारात परीक्षा होईल. त्यात प्रत्येक गटातून दहा स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले जातील. त्यानंतर २९ आक्टोंबर २०२३ ला ऑफलाइन पध्दतीने नागपूर येथे ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथे अंतिम फेरीची स्पर्धा घेण्यात येणार आहे. अंतिम फेरीत विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह,मेडल, व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती तिवारी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते पतंजली मुनी व प.पु.जनार्दन स्वामी महाराज यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, राज्य क्रिडा समिती व योगासन स्पर्धा प्रमुख राहुल (अंबादास) भिला येवला यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनिल मोहगांवकर व संघटनेचे अध्यक्ष डाॅ.मनोज निलपवार यांनी मार्गदर्शन पर भाषण देऊन क्रीडा क्षेत्रात योगासनाचे असलेले महत्त्व पटवून दिले. तर भूषण टाके यांनी उपांत्य फेरीच्या स्पर्धेतील योगासनांचे लकी ड्रॉ पद्धतीने लॉटस काढले व उषाताई शींदे यांनी स्पर्धा परीक्षेची माहिती दिली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लताताई होलगरे,अमित मिश्रा,विनायक बारापात्रे,पुरुषोत्तम थोटे,सुपर्णा पाल,उषाताई हिंदारिया,नयनाताई झाडे,तानाजी कडवे,छगन ढोबळे,शंकर जांभुळकर,राजेश धरमठोक,मंदाकीनी बालपांडे,नेहा कुंबलकर,वंदना क्षीरसागर,संदिप सेलगांवकर,गोविंद बुरडकर इ. उपस्थित होते.
ऑफलाइन उपस्थित होते तर ऑनलाइन माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी मनोहर पाल यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. सरते शेवटी स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपूर, तसेच गोंदिया जिल्ह्यातील संघटनेच्या अध्यक्षा सुमतीताई डोलारे आणि राज्यस्तरीय योगासन स्पर्धा समितीचे विषेश आभार मानले.