अंजनगाव बाजार समितीचे निवडणुकीत ,तिसऱ्या आघाडीमुळे येणार रंगत
बाजार समिती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची शेतकरी आघाडी मैदानात
शेतकरी आघाडी ठरणार डोकेदुखी
अंजनगाव सुर्जी , (मनोहर मुरकुटे)
अजंनगाव सुर्जी तालुक्यातील कृषी उपन्न बाजार समिती ही आधीच मागील कार्यकाळामधील विविध प्रश्नांनी चर्चेत असतांना अंजनगाव बाजार समीतीची निवडनुक येत्या 28 एप्रिल ला होत असून दर निवडणुकिमध्ये दोन पँनल हे निवडणूक रिगंणात असतात ह्या दोन्ही पॅनल मध्ये दर निवडणुकीला आलटून ,पालटून तेच उमेदवार किंवा त्यांचे घरातीलच नातेवाईक उभे असतात परंतु यावेळी ग्रामपंचायत मतदारसंघात शेतकऱ्यांची शेतकरी पँनल निवडणूक रिगंणात उतरली आहे. या शेतकरी आघाडीत नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे प्रदीप येवले आर्थिक दुर्बल मतदारसंघातुन लढत आहेत. सोबतच अनुसूचित जाती ,जमाती मधून हरीष सरदार ,सर्वसाधारण मतदासंघातुन दिनेश काळे व गोपाल गावनेर लढत आहेत. त्यासाठी चिन्हे वाटप होताच शेतकरी पँनल च्या उमेदवारानी प्रदीप येवले यांच्या “कर्मयोग “निवासस्थानी पत्रकार परीषद घेऊन शेतकरी पँनलची आवश्यकता का ? हे आपल्या बोलण्यातून सांगितले प्रदीप येवले यांनी बोलताना सांगितले की गेल्या 20 वर्षापासून निवडणूक रीगंणात असलेले तेच ,ते लोक निवडणूक लढवत आहेत निवडून येत आहेत .आता सुध्दा काही चे नातेवाईक निवडणूक रीगंणात आहेत. परंतु अंजनगाव बाजार समीती ही मृतावस्थेत गेलेली आहे. या बाजार समितीत आतापर्यत च्या संचालकांनी शेतकऱ्यांना साधे पिण्यासाठी पाणी ,प्रसाधन गृह ,बसण्यासाठी निवारा, शिदोरी मंडप ह्या मूलभूत गरजांची व्यवस्था केली नाही. आधीच अंजनगाव तालुका हा बारमाही ओलीत क्षेत्राचा असुनही येथील शेतकऱ्यांना आपला माल दर्यापूर ,परतवाडा येथे विक्रीसाठी न्यावा लागतो ही शोकांतिका आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे नवसंकल्प व दृढइच्छा शक्ती असणारे लोकच येथे पाठवावे असे आवाहन प्रदीप येवले यांनी पत्रकार परिषदेत केले. बाजार समीतीच्या जागेत भव्य मंगल कार्यालय उभारुन शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देता येते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देता येतो.शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसायासाठी दुकान गाळे बांधून उपलब्ध करुन देता येतात .शेतकऱ्यांचे धान्य सुरक्षेसाठी सुविधायुक्त गोडावून उभारता येतात ,अनेक उद्योग उभारुन शेतकऱ्यांना संकटकाळी मदत करता येते. इच्छा शक्ती असलेले लोक व निरपेक्ष काम करणारी लोकच ही बाजार समीती विकसीत करुन वाचवु शकतात. असे अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी या पत्रकार परीषदेत विनोद सरदार , सुरज फूके , अफसर बेग , जावेदभाई , बबलू इंगोले अजय शिराळकर , मंगेश रोकडे , स्मिताताई घोगरे , मिनाताई कोल्हे स्मिताताई लहाने , इंगळेताई , अमरदीप कुकडे , फहीमोद्दीन ,अशपाकभाई ,राजा भाऊ तायडे ,सुनिल येवले ,गोपाल भुयार ,चर्हाटे महाराज ,अनंत रोकडे ,शुभम मेश्राम ,तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.